बरड जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता सातवीतील दोन विद्यार्थिनींची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद 

बरड जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता सातवीतील दोन विद्यार्थिनींची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

फलटण:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरड ता.फलटण, येथील इयत्ता सातवीतील ईश्वरी हनुमंत पवार हिने अवघ्या 36 मिनिटांमध्ये सात किलोमीटर नॉन स्टॉप माउंटन रन ही धाव पूर्ण करून 200 पायऱ्या सलग गतीसह पूर्ण केल्याबद्दल लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिने आपले नाव नोंदवले आहे.

ईश्वरी पवार हिने कोथळे ते शिंगणापूर मंदिरापर्यंतची आव्हानात्मक धाव यशस्वीरीत्या पूर्ण करत तिने बालवयातच उच्चांकी विक्रम प्रस्थापित केला.याचबरोबर बरड शाळेतील सातवीतील विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी बापू लंगूटे हिने सीट अँड रिच या लवचिकता सिद्ध करणाऱ्या आव्हानात्मक व्यायाम प्रकारात 15 इंच एक सेंटीमीटर असा उच्चांकी विक्रम ऍथलेटिक्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला आहे.

या दोन्ही खेळाडूंना ए.के. अँथिलेटिक्स अकॅडमीचे अजित कर्णे सर यांचे मार्गदर्शन लाभले . या दोन्ही खेळाडूंच्या बाल वयातील महत्त्वपूर्ण यशाबद्दल केंद्रप्रमुख श्री धुमाळ, गटशिक्षणाधिकारी चन्नया मठपती, मुख्याध्यापक श्री नाळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापूराव गावडे,व सर्व सदस्य, सरपंच प्रकाश लंगूटे ,बरडचे ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी पालक ,शाळेतील सर्व शिक्षक वर्ग यांनी दोन्ही यशस्वी खेळाडूंचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, दस्त नोंदणी, भूमी अभिलेख कार्यालयात खाजगी एजंटांचा सुळसुळाट! पक्षांचे कार्यकर्तेच बनले आहेत दलाल; अधिकाऱ्यांकडून कामे करून देतो म्हणून सर्वसामान्य जनतेची करत आहेत लूट! लुटारू टोळ्यांनी स्वतःची घरे भरली! रामनगरीत पापाचा घडा एक दिवस भरतोच!

31
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, दस्त नोंदणी, भूमी अभिलेख कार्यालयात खाजगी एजंटांचा सुळसुळाट! पक्षांचे कार्यकर्तेच बनले आहेत दलाल; अधिकाऱ्यांकडून कामे करून देतो म्हणून सर्वसामान्य जनतेची करत आहेत लूट! लुटारू टोळ्यांनी स्वतःची घरे भरली! रामनगरीत पापाचा घडा एक दिवस भरतोच!

error: Content is protected !!