लोकनेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भारतीय पत्रकार संघाच्या वतीने फलटण येथे आदरांजली
फलटण शहर प्रतिनिधी:-जुबेरभाई कोतवाल: दि. 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी अजित दादा पवार मुंबईहून बारामतीसाठी चार्टर विमानाने निघाले होते बारामती विमानतळावर विमान उतरवत असताना तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमान जवळच असलेल्या एका शेतात कोसळले हा अपघात इतका भीषण होता की त्यामुळे विमानाला आग लागली यातच लोकनेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. व महाराष्ट्र राज्य एका कर्तुत्ववान नेत्याला गमावून बसले अजितदादा पवार दूरदृष्टी असणारे नेते होते त्यांना महाराष्ट्र राज्याचे लाडके झुंजार, निडर तडफदार, कर्तृत्ववान अभ्यासू कुशल नेतृत्व व विकास पुत्र अशी त्यांची कीर्ती होती अजितदादा हे लोकांच्या हितासाठी रात्रंदिवस काम करणारे नेते होते सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि विकासकामात त्यांचे योगदान मोलाचे होते. प्रशासनावर पकड असणारा नेता अशी त्यांची ओळख होती.अशा या आदरणीय स्वर्गवासी अजितदादा पवार यांना भारतीय पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा व तालुका पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी भारतीय पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजकुमार काकडे, जिल्हाउपाध्यक्ष प्रा.विकास शिंदे , पत्रकार हल्लाविरोधी समिती प्रमुख आप्पासाहेब तांबे, तालुका सहसचिव गणेश भोईटे, तालुका संघटक प्रशांत सोनवणे,सचिव अमोल पवार,तालुका सदस्य जुबेर कोतवाल , लोकशाही भारतचे संपादक सागर चव्हाण , अजित जाधव ,शशिकांत भगत , अमोल शेलार आकीब कोतवाल यांच्यासह रामराजे शॉपिंग सेंटर मधील व्यापारी व नागरिक यांची उपस्थिती होती.









