फलटण तालुक्यात 8,900 घरकुले मंजूर पैकी गरजू किती? खरे लाभार्थी अजूनही वंचितच?
तालुक्यातील घरकुल पडताळणी कर्मचारी/अधिकारी , गावटगे व ग्रामसेवकांची मिलीभगत;घरकुले बसविण्यासाठी बोगस लाभार्थ्यांकडून प्रत्येकी 5,000 रु मलिदा!
“घरकुल लुटणारे गाव टगे”: भाग-3
फलटण: फलटण तालुक्यामध्ये 131 ग्रामपंचायती असून प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना 2.0 मध्ये एकूण 8,900 लोकांना घरकुले मंजूर झालेली आहेत. पैकी यातील खरे लाभार्थी शोधले असता 2 हजार सुध्दा आकडा गाठता येणार नाही. तरी यातील अनेक लोकांना प्रत्यक्ष पाहणी केली असता पक्की घरे असल्याचे दिसून येत आहेत.
या शासनाच्या योजनेमध्ये गावठग्यांकडून गावचे धनधांडगे लोक यांना घरकुलांची खिरापत वाटलेली दिसून येत आहे. गावगाड्यातील सत्ताधारी लोकांना हाताशी धरून आपली नावे बसवली असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. यांना आता रोखले नाही तर हे घरकुले लुटणारे गावटगे यांची टोळी वाढतच जाईल.
तर दुसरीकडे गावगाड्यातील बेघर लोक, दुसऱ्यांच्या घरात भाड्याने राहणारे लोक,पक्की घरी नसलेले लोक आजही या योजनेपासून वंचितच असल्याचे दिसून येत आहे.
ज्यावेळी घरकुलांच्या नोंदणी झाल्यानंतर प्रत्यक्ष पडताळणी वेळी फलटण पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी यांनी गावोगावी जाऊन लोकांची पाहणी केली. यामध्ये त्यांना अनेक लोक हे बोगस असल्याचे दिसले. परंतु यावर आर्थिक सेटलमेंट झाली. फलटण तालुक्यातील गावगाड्यातील या बोगस लाभार्थ्यांकडून घरकुले बसवण्यासाठी प्रत्येकी हा पाच हजार रुपयांचा मलिदा यांच्याकडून घेण्यात आला असल्याचे समोर येत आहे.
या जर अशा गोष्टी असतील तर प्रशासनामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होऊन घरकुल लुटारूंना साथ दिली जात आहे. सरकारी निधी पद्धतशीरपणे लुटला जात आहे. यावर कोणाचा अंकुश असणार आहे.
यावर आता सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन मॅडम या काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अक्षय घावटे यांनी सदर विषयात लक्ष घालून ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांना या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सूचना करणे गरजेचे आहे. अन्यथा घरकुलांचे लुटेरे योजना लुटायला बसलेले आहेतच.
क्रमशः.. भाग:3







