जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळज ता. फलटण येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
फलटण: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळज तालुका फलटण येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला..
स्वातंत्र्य दिनादिवशी सकाळी सात वाजता प्रभात फेरीचे नियोजन करण्यात आले होते..
प्रभात फेरीमध्ये मुलांनी देशभक्तीपर घोषणा देऊन गावातील वातावरण देशभक्तीमय केले….
त्यामध्ये मुलांचे ढोल ताशा पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते…
प्रथम प्राथमिक आरोग्य उपकेंद्र त्यानंतर पतसंस्था तसेच ग्रामपंचायत आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सह. बँक येथे आणि त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहण करण्यात आले….
जिल्हा परिषदेचे ध्वजारोहण मुख्या. श्री. प्रकाश भोसले यांनी केले…
सर्वप्रथम ध्वजाचे पूजन, त्यानंतर मानवंदना,ध्वजारोहण, राष्ट्रीय गीत वंदे मातरम , राष्ट्रगीत जन-गण-मन आणि राज्यगीताचे गायन करण्यात आले…. त्यानंतर मुलांनी देशभक्तीपर विविध घोषणा दिल्या…
घोषणा दिल्यानंतर *सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये देशभक्ती गीतांवर आधारित संगीतमय कवायत सादर करण्यात आली* ….
*त्यानंतर मुलांची देशभक्तीपर आणि स्वातंत्र्यदिन विषयक भाषणे झाली* …..
*तंबाखूमुक्त भारत अभियान अंतर्गत “तंबाखू मुक्तीची शपथ” तसेच केंद्र शासनाच्या वतीने सुरू असलेल्या नवभारत साक्षरता अभियानांतर्गत _”साक्षरतेची शपथ”_ सर्वांना देण्यात आली* ….
हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत 11, 12, 13 आणि 14 ऑगस्ट या चार दिवशी शाळेत विविध स्पर्धा घेण्यात आल्या….
चित्रकला, रांगोळी, हस्ताक्षर, निबंध, वक्तृत्व या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या… देशभक्ती, मेरा भारत महान, तिरंगा आणि स्वातंञ्य या विषयावर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या….
लहान, मध्यम आणि मोठा गट अशा तीन गटात स्पर्धा घेण्यात आल्या ….
त्यांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते पार पडले….
प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी,वही पेन,प्रमाणपत्र तसेच द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही शालोपयोगी साहित्य बक्षीसरुपी देण्यात आले…
तसेच *”मी ज्ञानी होणार” या राज्यस्तरीय उपक्रमातील विजेत्यांनाही बक्षीसे देण्यात आली तसेच त्यांना गौरवण्यात आले* …
बक्षिसांचे नियोजन शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष श्री. राहुलजी गाढवे यांच्या सौजन्याने केले होते…
बक्षीस वितरणानंतरच सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आला….
खूप मोठ्या प्रमाणात खाऊची आवक ग्रामस्थांकडून झाली होती….
कार्यक्रमासाठी काळज गावचे सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य तसेच काळज गावचे माजी सर्व सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य **जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माजी विद्यार्थी मंच अध्यक्ष उपाध्यक्ष,सदस्य* , विविध मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष, सदस्य, तसेच अंगणवाड्यांचे विद्यार्थी शिक्षिका, पालक, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…..
कार्यक्रमाचे नियोजन मुख्या. श्री प्रकाश भोसले सर सूत्रसंचालन श्री. विकास बोंद्रे सर यांनी तर कार्यक्रमाच्या शेवटी सौ. अर्चना खराडे यांनी सर्वांचे आभार मानले…
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील उपशिक्षिका सौ.रुपाली शिंदे व सौ अनुराधा लांबाते यांचेही मोलाचे सहकार्य लाभले…..








