शंभू महादेवाच्या डोंगररांगेत सह्याद्रीचा उदय!
कोळकी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे युवा नेते सह्याद्रीभैया कदम यांचा दणदणीत विजय
फलटण: कोळकी जिल्हा परिषद गटामुळे अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये आज फलटणचे माजी आमदार स्वर्गीय चिमणराव कदम साहेब यांचे सुपुत्र युवा नेते सह्याद्री भैया कदम यांचा बहुमताने विजय झालेला आहे.
त्यांचे या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. स्वर्गीय आमदार चिमणरावजी कदम यांचे कार्य व वारसा तसेच सह्याद्री भैया यांचा तळागाळातील जनसंपर्क याच्या बळावरती त्यांनी हा विजय मिळवला असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.
आमचे प्रतिनिधी यांनी सह्याद्री भैया यांच्या बरोबर संपर्क साधला असता ते म्हणाले की, हा विजय सर्व कार्यकर्त्यांना, व स्वर्गीय माजी आमदार चिमणराव कदम यांना समर्पित आहे. इथून पुढे ही लोकांचे कामे करण्यासाठी आपण तत्पर राहणार आहोत असे म्हणाले.









