पै.विष्णू (अण्णा) लोखंडे यांनी मारली जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीची कुस्ती
वाठार निंबाळकर जिल्हा परिषद गटातून दणदणीत विजय
फलटण: ढवळ गावचे सुपुत्र भारतीय जनता पार्टीचे नेते पै. विष्णू किसन लोखंडे यांनी वाठार निंबाळकर जिल्हा परिषद गटामधून प्रचंड बहुमताने विजय मिळवलेला आहे.
हाडाचे पैलवान असलेले मुरब्बी राजकारणी विष्णू लोखंडे यांनी जिल्हा परिषदेच्या राजकीय मैदानात कुस्ती जिंकलेली आहे.
जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्यांचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर,आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादतात्या साळुंखे पाटील,भारतीय जनता पार्टीचे नेते, कार्यकर्ते,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Views: 104









