जाधववाडी येथील ऑरेंज लॉजवर पोलिसांचा छापा,वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका इसमावर कारवाई Dysp विशाल खांबे ॲक्शन मोडवर!

जाधववाडी येथील ऑरेंज लॉजवर पोलिसांचा छापा,वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका इसमावर कारवाई

Dysp विशाल खांबे ॲक्शन मोडवर!

फलटण: जाधववाडी ता. फलटण येथील लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसाय करणा-या इसमावर पोलीसांची कारवाई झालेली आहे.

पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,

दि.२५/०२/२०२६ रोजी मा.श्री विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण उपविभाग फलटण यांना गोपणीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे जाधववाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत ऑरेंज लॉज येथे प्रविण रामचंद्र दडस रा. टाकेवाडी, ता.माण, जि. सातारा हा इसम वेश्या व्यवसाय चालवत आहे. अशी खात्राशीर बातमी मिळाल्यांनतर सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून पुढील कारवाई करणेबाबत पोलीस निरीक्षक श्री अरविंद काळे फलटण शहर पोलीस ठाणे यांना कळविण्यात आले. मिळाले बातमीप्रमाणे जाधववाडी फलटण येथील ऑरेंज लॉजवर डमी गि-हाईक पाठवून छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम नामे प्रवीण रामचंद्र दडस रा. टाकेवाडी ता. माण जि.सातारा हा एका महिलेचा स्वतःच्या आर्थिक फायदयाकरिता वेश्या व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने प्रवीण रामचंद्र दडस वय-२६ वर्षे रा. टाकेवाडी ता. माण जि. सातारा यांचेवर फलटण शहर पोलीस ठाणेस गु.र.नं.६४/२०२६, भा. न्या. संहि. कलम १४३(२),१४४ (२), सह स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधि. १९५६ चे कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला असून त्यास सदर गुन्हयात दि.२५/०२/२०२६ रोजी अटक करणेत आली आहे. सदर आरोपीस दि.२६/०२/२०२६ रोजी मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्याची दि.०२/०३/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर करणेत आली आहे. सदर गुन्हयाचा तपास श्री अरविंद काळे पोलीस निरीक्षक फलटण शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा. श्री. विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभाग फलटण यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. अरविंद काळे, महिला पोलीस उपनिरीक्षक विजयमाला गाजरे, पोलीस अंमलदार सचिन भोसले, नितीन सजगणे, बापूराव धायगुडे, दत्तात्रय नाळे, दत्तात्रय लवटे, गणेश अवघडे, निखील गायकवाड यांनी पूर्ण केली आहे.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!