धुळदेव येथे जबरी घरफोडी! 4 लाखाचे सोन्याचे दागिने चोरीला!


धुळदेव येथे जबरी घरफोडी!

4 लाखाचे सोन्याचे दागिने चोरीला!

फलटण: धुळदेव ता.फलटण येथे जबरी घरफोडी झालेली असून यामध्ये सुमारे 4 लाखाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे समोर आले आहे.

 

 

फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, व दिलेल्या फिर्यादीवरून मनिष दिलीप ढवळे वय. 33 वर्षे, व्यवसाय पेंटिंग कॉन्ट्रक्टर/शेती, रा.धुळदेव, फलटण, ता. फलटण, जि. सातारा हे आई श्रीमती इंदुबाई, पत्नी सौ. वर्षा व दोन मुली व एक मुलगा असे एकत्र राहतात. फिर्यादींचा पेंटिंग कॉन्ट्रक्टर चा व्यवसाय असुन ते रोज सकाळी 09.00 वा कामावर जातात व सायंकाळी 6.00 वा. घरी येतात. आई व पत्नी शेती व्यवसाय करतात. आमचे घरापासुन अंदाजे अर्धा किलो मिटर अंतरावर शेतात जनावरांचा गोठा असुन तेथे मी व माझी पत्नी सौ. वर्षा असे आम्ही रोज झोपणेसाठी शेतात जनावरांच्या गोठयावर जात असतो.

 

दि.22/02/2026 रोजी मी कामावरुन आल्यानंतर जेवण करुन नेहमीप्रमाणे रात्री 10.00 वाजताचे सुमारास मी व माझी पत्नी सौ. वर्षा असे आम्ही शेतातील गोठ्यावर झोपण्यासाठी गेलो. व माझी आई आणि तीन मुले घरीच हॉलमध्ये नेहमीप्रमाणे झोपली होती. त्यानंतर पहाटे 04.30 वाजताचे सुमारास माझी आई श्रीमती इंदुबाई हिचा मला फोन आला व तिने रडत आपल्या घरी चोरी झाली आहे असे सांगून फोन कट केला. त्यामुळे मी लगेचच घरी गेलो. त्यावेळी घराच्या मुख्य दरवाज्याला कडी लावली होती. ती कड़ी काढुन मी घरात गेलो. त्यावेळी आई घाबरलेली होती. मी घरात जावुन पाहीले असता घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. घरातील किचनचे दरवाजाचा कडी कोयंडा तोडलेला दिसला. तसेच घरातील दोन्ही बेडरुमध्ये असलेली लाकडी कपाटांचे लॉक तोडुन दोन्ही कपाटातील माझे व माझ्या बहिणी पल्लवी महेश शिंदे रा. पुणे, रेश्मा शिवाजी जगदाळे रा. मुंबई या बाहेरगावी राहणेस असलेने व त्यांनी माझे जवळ ठेवण्यासाठी दिलेले सोन्याचे दागिने चोरीस गेलेले दिसले. त्यानंतर मी घराचे बाहेरचे बाजुस जावुन पाहणी केली असता घराचे मागील बाजुचे कंपांऊँडचे लोखंडी गेटचे कुलुप कशाने तरी तोडुन घराचे परीसरात प्रवेश करुन घराचे पुर्वेस असलेल्या किचनच्या दरवाजाचा कड़ी कोयंडा तोडुन घरात प्रवेश करुन घरात ठेवलेले माझे व माझ्या दोन बहिणींचे सोन्याचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहेत. माझे चोरीस गेले मालाचे वर्णन खालीलप्रमाणे-

 

1) 87,500/- रु. किंमतीचे 25 ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे मिनी गंठण

 

2) 17,500 /- रु. किंमतीचे 5 ग्रॅम वजनाची एक सोन्याची चैन

 

3) 42,000/- रु. किंमतीचे 12 ग्रॅम वजनाच एक सोन्याचे ब्रेसलेट

 

4) 17,500 /-

 

रु. किंमतीचे 5 ग्रॅम वजनाची कानातील सोन्याचे वेल

 

5) 1,92,500/- रु

 

. किंमतीचे 55 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 6 अंगठ्या

 

6) 17,500/-

 

रु. किंमतीचे 5

 

ग्रॅम वजनाची एक सोन्याची चैन

 

7) 17,500 /-

 

रु. किंमतीचे 5

 

ग्रॅम वजनाची एक सोन्याची ठुशी

 

8) 17.500/-

 

रु. किंमतीचे 5

 

ग्रॅम वजनाची कानातील झुमके व फुले

 

9) 7000/- रु. किंमतीचे 2 ग्रॅम वजनाचे गळ्यातील दोन बदाम

 

एकूण 4.16,500/-

 

दि. 22/02/2026 रोजीचे रात्री 11.00 ते दि.23/02/2026 रोजीचे पहाटे 04.30 वा. चे दरम्यान मौजे धुळदेव, फलटण ता. फलटण जि. सातारा गावचे ह‌द्दीत फिर्यादी यांचे राहते घराचे कंपाऊंडचे लोखंडी गेटचे कुलुप कशाने तरी तोडुन घराचे परीसरात प्रवेश करून घराचे पुर्वेस असलेल्या किचनच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडुन घरात प्रवेश करुन घरात ठेवलेले वरील वर्णनाचे व 4,16,500/- रु. किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत.

 

अज्ञात चोरट्यावरती फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला असून,पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन नम हे करत आहेत.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!