फलटण बस स्थानकात दिवसाढवळ्या चोरी, लागोपाठ चोरीच्या घटना वाढल्या! पोलीस गस्त वाढवण्याची प्रवाशांची मागणी!, फलटण बसस्थानक राम भरोसे? यापूर्वीचे पोलीस अधिकारी श्री.बोके, श्री.उमेश कोळी यांच्या दबंग कामगिरीची प्रवाशांना आज ही आठवण!

फलटण बस स्थानकात दिवसाढवळ्या चोरी, लागोपाठ चोरीच्या घटना वाढल्या!

पोलीस गस्त वाढवण्याची प्रवाशांची मागणी!, फलटण बसस्थानक राम भरोसे?

यापूर्वीचे पोलीस अधिकारी श्री.बोके, श्री.उमेश कोळी यांच्या दबंग कामगिरीची प्रवाशांना आज ही आठवण!

फलटण: फलटण बस स्थानकातून एका महिलेचे दागिने दिवसाढवळ्या चोरी झाल्याची घटना नुकतीच घडलेली आहे.

फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार उषा हणुमंत बळीप वय 58 वर्षे, व्यवसाय गृहिणी, रा. नवरत्न, बारवबाग, फलटण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून

दि.26/02/2026 रोजी सकाळी 09.15 वा चे सुमारास मी व माझे पती हणुमंत असे दहिवडी येथे आमच्या पाहुण्यांचे वर्षश्राध्द कार्यक्रमाकरीता निघालो होतो. फलटण एस.टी. स्टॅण्डवर आम्ही बराच वेळ बसलो, त्यानंतर सकाळी 10.15 वा चे सुमारास वल्लभनगर गोंदवले ही बस लागलेने मी व माझे पती त्या बसमध्ये चढण्याकरीता गेलो असता बसला खुप गर्दी होती. त्या गर्दीमधुन मी बसमध्ये चढत असताना माझ्या गळ्याला काहीतरी टोचल्यासारखे वाटले म्हणुन मी गळ्याला हात लावुन पाहिला असता माझ्या गळ्यातील सोन्याच्या चैनमधील मिनी गंठण मला सापडले नाही. त्यावेळी मी माझे पती हणुमंत यांना माझे सोन्याच्या चैनमधील मिनी गंठण सापडत नाही असे सांगितले त्यानंतर तेथेच एस.टी. बसच्या आजुबाजुला आम्ही सोन्याच्या चैनमधील मिनी गंठनचा शोध घेतला असता ते आम्हाला कोठेच सापडले नाही. यावरून माझी खात्री झाली की, फलाट क्र. 7 येथे वल्लभनगर गोंदवले बसमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझ्या नकळत गळ्यातील सोन्याच्या चैनमधील मिनी गंठन चोरी करुन नेला आहे. माझे चोरीस गेलेल्या सोन्याच्या चैनमधील मिनी गंठनचे वर्णन खालील प्रमाणे-

1)30,000/- रूपये किंमतीचे 17 ग्रॅम 780 मिली वजनाचे सोन्याचे चैनमधील मिनी गंठण त्यामध्ये सोन्याच्या दोन वाट्या व त्याला खालील बाजुस मनी असलेले

एकूण किंमत 30,000/- रुपये

सध्या फलटण बस स्थानकावर चोराचे प्रमाण वाढलेले आहे. स्थानकावरती पोलिसांची ड्युटी असणे महत्त्वाचे आहे. यामुळे महिला संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच बस स्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे वाढवण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.

अज्ञात चोरट्याविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस हवालदार पूनम वाघ करीत आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!