राजाळे गावच्या सौ.मनीषाताई संदीप पवार यांची महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड
राजे गटाकडून निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी!
फलटण दि: राजाळे ता.फलटण गावचे युवा नेते संदीपदादा पवार यांच्या पत्नी सौ.मनीषाताई संदीप पवार यांची महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड करण्यात आली आहे.
राजे गटाचे राजाळे गावचे निष्ठावंत कार्यकर्ते संदीपदादा पवार यांच्या त्या पत्नी होत. सौ. मनीषाताई पवार यांनी दूध उत्पादन क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्यांच्यामुळे अनेक महिला या दुग्धोत्पादनात कार्यरत आहेत.
सौ.मनिषाताई संदीपदादा पवार यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे मा.सभापती आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, मा.आ. दिपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर,नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर , जिल्हा परिषद सदस्या सौ.ज्योती गौतम मोरे,फलटण पंचायत समिती सदस्या सौ.पुष्पाताई चोपडे,राजाळे गावचे माजी सरपंच संभाजीबापू निंबाळकर ,युवा नेते विनोदशेठ शेडगे ,मान्यवर मंडळी तसेच राजाळे व परिसरातील ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन होत आहे.








