राजुरी येथील व्यापाऱ्याला 12 लाखांचा गंडा!
फलटण: राजुरी ता. फलटण येथे एका व्यापाऱ्याला 12 लाखाचा गंडा घालण्यात आलेला आहे. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मधून मिळालेल्या माहितीनुसार व फिर्यादीवरून..
लहू पांडुरंग भिसे यांचे महालक्ष्मी व्हेजिटेबल ट्रान्सपोर्ट आणि सप्लायर्स नावचे राजुरी ता. फलटण गावचे हद्दीत ऑफिस आहे. सदर ऑफिसमधून राजुरी व माळशिरस, फोडशिरस, सदाशिव नगर, गिरवी, या भागातील शेतक-यांचा भाजीपाला खरेदी करुन पुढे व्यापा-यांना विकत होतो. सुमारे 01 वर्षापुर्वी आमचे भागामध्ये व्यापारी अमोल मनसुब जोंधळे, रा. जोंधळेमळा, ता. संगमनेर, जि .अहिल्यानगर, हा भाजीपाला विकत घेत असल्याने त्यांची माझी ओळख झाली होती. दिनांक-11/01/2026 रोजी अमोल जोंधळे याने माझेशी संपर्क करुन शेवगा खरेदी करणार असल्याचे सांगितले.
तरी दिनांक-11/01/2026 ते दिनांक-25/01/2026 रोजीचे दरम्यान मौजे राजुरी ता. फलटण गावचे हद्दीत माझ्या महालक्ष्मी व्हेजिटेबल ट्रान्सपोर्ट आणि सप्लायर्स नावचे दुकानामध्ये आरोपी अमोल मनसुब जोंधळे, रा. जोंधळेमळा, कोची, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर याने माझ्याकडून वेळोवेळी 16,63,332/-रुपये किंमतीचा शेवगा खरेदी करुन माझा विश्वास संपादन करुन माझ्याकडून खरेदी केलेल्या शेवग्याच्या रक्कम पोटी 4,38,170/-रूपये ऑनलाईन स्वरुपात देवून 12,25,162/-रुपये न देता माझी आर्थीक फसवणूक केली आहे. त्यास मी वेळोवेळी फोन वरुन पैसे मागितले. त्यावेळी आरोपीने पैसे मागायचे नाहीत, तुला काय करायचे ते कर अशी धमकी दिली आहे. व आर्थिक फसवणूक केली आहे.
या दिलेल्या फिर्यादीवरून फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तपास डी.बी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार हे करत आहेत.









