गॅस,पेट्रोल-डिजेलचा पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी फलटण तहसिल कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये – तहसीलदार डॉ. अभिजित जाधव
फलटण : जागतिक परिस्थिती आणि इंधन पुरवठा साखळीतील संभाव्य ताण लक्षात घेता फलटण तालुक्यातील नागरिकांना एलपीजी (LPG) आणि पेट्रोल-डिजेलचा पुरवठा सुरळीतपणे होणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी नारिकांकडून भीतीपोटी अतिरिक्त साठा केला जाण्याची शक्यता असलेने टंचाई निर्माण होवू शकते. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि वितरणात पारदर्शकता राखण्यासाठी फलटण तालुकास्तरावर (पुरवठा शाखा) तालुका नियंत्रण कक्ष स्थापना करण्यात आली आहे. तरी सर्व नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहिती करीता व आवश्यक मदतीकरीता कार्यालयीन वेळेत सकाळी 9.45 ते संध्याकाळी 6.15 पर्यंत या क्रमांकावर 8788826834 संपर्क साधावा,असे आवाहन फलटणचे तहसिलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले आहे.









