टाकळवाडे गावातील ग्रामस्थांना दूषित पाणीपुरवठा! ग्रामपंचायतकडून ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ?  नूतन फिल्टर आरो यंत्रणा ही धूळखात!


टाकळवाडे गावातील ग्रामस्थांना दूषित पाणीपुरवठा!

ग्रामपंचायतकडून ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ?

नूतन फिल्टर आरो यंत्रणा ही धूळखात!

फलटण:ग्रामपंचायत टाकळवाडे ता.फलटण यांनी आज गावाला पिण्यासाठी वितरित केलेले पाणी ,हे पाणी पाहता असे लक्षात आले की हे पाणी जनावरांनी पिण्याच्या ही लायकीचे नाही असे पाणी गावातील प्रतिष्ठित वस्तीवर राहणारे लोकनेते गावकऱ्यांना पाजत असताना ते लोकांना जनावरापेक्षा ही कमी समजत आहेत हे दिसून येते . यातून दरवर्षी येणारे 20 लाखांहून जास्त ग्रामपंचायत (म्हणजेच गावचा व गावातील लोकांच्या विकासासाठी येणारा ) निधी नक्की जातो कुठ असा प्रश्न आम्हा ग्रामस्थाना पडत आहे . मागील पाच वर्षात या ग्रामपंचायत चा निधी सोडून आमदार निधी , खासदार निधी , मंत्र्यांच्या निधीतून बरेच गावातील रस्त्याची कामे मागून थोडीफार केली सुधा मग ग्रामपंचायत चा निधी वापरून जर बॉडी ला गावाला निदान चांगलं पाणी पण पाजता आलं नसेल तर आपली त्या पदावर बसण्याची होती का ही तपासून घ्यावी. #काळा कारभार ही ग्रामस्थ अजित इवरे यांनी टाकळवाडे गावच्या आम्ही टाकळवाडेकर ग्रुप वरील पोस्ट चर्चेत आहे.

 

एकंदरीतच गावाला दूषित पाणी पुरवठा होत असून हा हा गंभीर प्रश्न असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच ग्रामपंचायतकडून ग्रामस्थांसाठी नाममात्र शुल्क वापरून बसवण्यात आलेली शुद्ध पाण्याची फिल्टर आरो यंत्रणा ही धूळखात पडून आहे. गावातील गाव पुढारी वस्तीवर राहत असल्याने त्यांना या समस्या जाणवत नसल्याच्या आरोप ग्रामस्थांनी केला आहे.पाणी ही रोज गावात सोडले जात नाही.संबंधितांनी यावर योग्य त्या उपाय योजना राबण्यात याव्यात अशी मागणी आता ग्रामस्थांमध्ये जोर धरू लागली आहे.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!