तो पुन्हा आला!सोनगाव बंगला येथे बिबट्याने पाडला कुत्र्याचा फडशा! वनविभाग घटनास्थळी! ग्रामस्थांनी घाबरून न जाण्याचे वन विभागाचे आवाहन!


तो पुन्हा आला!सोनगाव बंगला येथे बिबट्याने पाडला कुत्र्याचा फडशा!

वनविभाग घटनास्थळी! ग्रामस्थांनी घाबरून न जाण्याचे वन विभागाचे आवाहन!

 

फलटण: फलटण वन विभाग व स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीवरून काल रात्री सोनगाव सरडे गावच्या हद्दीतील सोनगाव बंगला येथील श्री. शहा यांच्या बाहुबली फॉर्म हाऊस मधील पाळीव कुत्रा संशयित मृत अवस्थेत आढळून आला असता वनविभागातील कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. पाहणी केली असता त्यांनी असे अनुमान लावले की सदरचा हल्ला हा बिबट्याकडून झालेला दिसून येत आहे. तरी गावातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सतर्क रहावे.घाबरून जाऊ नये असे आवाहन फलटण वन विभागाचे वनपाल नितीन जगदाळे यांनी केले आहे.तसेच संशयित काही आढळल्यास वन विभागाशी संपर्क साधावा.  श्री.नितीन जगदाळे- 9665503999.

 

यावेळी त्यांच्या समवेत विशाल शिंदे वनरक्षक फलटण,ग्लोबल अर्थ फाउंडेशनचे सचिन जाधव व टीम उपस्थित होती.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!