फलटण पंचायत समितीचे नवनिर्वाचित उपसभापती अमोल सस्ते यांनी स्वीकारला पदभार  फलटण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध! – उपसभापती अमोल सस्ते

फलटण पंचायत समितीचे नवनिर्वाचित उपसभापती अमोल सस्ते यांनी स्वीकारला पदभार

फलटण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध! – उपसभापती अमोल सस्ते

फलटण: फलटण तालुक्यातील झालेल्या पंचायत समितीच्या अटीतटीच्या लढतीत राजे गट 8 व खासदार गटाचे 8 सदस्य निवडून आले होते.

सभापती व उपसभापती निवडी या बिनविरोध झाल्या.यामध्ये शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य अमोल सस्ते यांची बिनविरोध उपसभापती पदी निवड करण्यात आली होती.

आज त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला असून त्यांनी आज आपल्या कामाची सुरुवात केली आहे. पंचायत समितीतील विविध विभागातील पदाधिकारी यांच्या गाठी भेटी घेण्यात आल्या असून प्रशासन व प्रतिनिधी यांच्या एकत्रित भूमिकेतून फलटण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित उपसभापती अमोल सस्ते यांनी केले.

यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश बोंबले, शिवसेनेचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नानासो (पिंटू) इवरे, शिवसेनेचे विराजभय्या खराडे, शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी राजे गटाचे माजी पंचायत समितीचे सदस्य सभापती, उपसभापती यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, यांच्या नावाच्या घोषणेने परिसर दणाणून सोडला होता.

यावेळी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या टाकल्या होत्या. उपसभापतींचे सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

शिवसेना राजे गट पंचायत समितीच्या सत्तेत सहभागी होऊन उपसभापतीपद मिळवल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह होता. व त्यांना पुढील काळात बळ मिळणार आहे. तसेच उपसभापतीपदामुळे राजे गटाला बूस्टर डोस मिळाल्याने गटाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. आगामी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये याची झलक नक्कीच पाहायला मिळताना दिसेल हे मात्र नक्की.

यावेळी आमच्या  प्रतिनिधींशी बोलताना उपसभापती म्हणाले की, फलटणच्या रामनगरीतील रामराज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सेवक हनुमानाची भूमिका बजावणार !- उपसभापती अमोल सस्ते*

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!