महापुरुष हे कोण्या जातीचे नसतात ते अखिल मानव जातीचे असतात – प्रा.रविंद्र कोकरे, पाडेगाव येथे महापुरुष जयंती महोत्सव सुरू 

महापुरुष हे कोण्या जातीचे नसतात ते अखिल मानव जातीचे असतात – प्रा.रविंद्र कोकरे

पाडेगाव येथे महापुरुष जयंती महोत्सव सुरू

फलटण: समतेची व सामाजिक ऐक्याची कास धरून जात, पात, धर्म, वंश, वर्ण, स्त्री, पुरुष, उच्च, नीच, गरीब, श्रीमंत, शूद्र, भेदभाव यांची जळमटे झटकून टाकूया आणि आपण सुजान, सुसंस्कृत, निरोगी, भेद विरहीत, विश्वव्यापक समाज घडवूया. असे परखड विचार प्रबोधनकार, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रवींद्र कोकरे यांनी मांडले.

पाडेगांव ( ता.फलटण ) सामाजिक विकास फाउंडेशन आयोजित महापुरुष जयंती महोत्सव वर्ष पाचवे यात प्रथम पुष्प पुण्यश्लोक अहिल्यामाता ते क्रांतीजोती सावित्रीमाई क्रांतीपर्व या विषयांवर मौलिक मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी ऊस संशोधक मोरे साहेब,प्रमुख उपस्थिती पंचायत समिती सदस्य राहूल नरुटे, महेश तावरे, मिलींद कदम, दतात्रय काळे, नितीन सूळ, दादासो नरुटे.क्रांती ज्योत प्रज्वलीत करून मान्यवरांचा सत्कार वृक्ष, पुस्तक, महापुरूष प्रतिमा देऊन केला.

दांभिकता, भोंदूबाबा यांचे समाज्यात पेव फुटले आहे.सामान्य जनतेने शेतकऱ्याचा आसूड हाती घेऊन आयोग्य बाबींवर फटकारे मारणे काळाची गरज आहे.गुलामगिरी झुगारून सत्यशोधक दृष्टीने तरुणाईने एकत्रीत येऊन राज सत्तेला जाब विचारणे हीच खरी क्रांती आहे.महिलांनी अत्याचार, अन्याय विरोध आपली नारी शक्ती जागृत करणे आवश्यक आहे. असे विचार प्रा .कोकरे यांनी मांडले.

प्रास्ताविक जि.प सदस्य गिरीश बनकर, आभार प्रभाकर नेवसे यांनी मानले. पंचक्रोशीतील बहुसंख्येने व्याख्यानास श्रोता वर्ग उपस्थित होता.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!