प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा दहावीचा सलग सातव्या वर्षी १०० टक्के निकाल विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा दहावीचा सलग सातव्या वर्षी १०० टक्के निकाल

विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

फलटण – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यंदा फलटण तालुक्याचा एकूण निकाल ९२.४४ टक्के लागला असताना, सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी (फलटण) येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत सलग सातव्या वर्षी शंभर टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे.यंदाच्या परीक्षेत कु. विनंती किरण जगदाळे हिने ९४ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. चैतन्य गणपत तोरस्कर याने ९३.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर कु. ज्ञानेश्वरी अमरजीत डोंबाळे हिने ९२.६० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक संपादन केला.प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी येथील एकूण २८ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी तब्बल २५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले असून ३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशामागे सौ. सुजाता गायकवाड, श्रीमती आशादेवी भराडे, महेंद्र कातुरे, सौ.आहिल्या कवितके,ज्ञानेश्वर जाधव, सौ. स्नेहल भोसले आणि सौ. अश्विनी भिसे या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.विशेष म्हणजे, सरस्वती शिक्षण संस्थेच्या कोळकी व गुणवरे येथील दोन्ही शाखांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागल्याने संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

या यशाबद्दल संस्थापक भिमराव माने, संस्थेचे अध्यक्ष प्रदीप माने, कोषाध्यक्ष सौ. सविता माने, सचिव विशाल पवार, व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड, प्राचार्या सुजाता गायकवाड, पर्यवेक्षक महेंद्र कातुरे, समन्वयिका अहिल्या कवितके तसेच माधुरी माने यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या परिश्रमाचे कौतुक केले.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!