Rkc इन्फ्रा कंपनीकडून गडकरींचे संत ज्ञानेश्वर पालखी महामार्ग हरित मार्ग बनवण्याचे स्वप्न धुळीस!
पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूने झाडे फक्त दिखाव्यापूर्तीच?देशी वड,पिंपळ,चिंच वृक्ष लागवड व संगोपन होणे गरजेचे!
हायवेच्या नावाने चांगभले भाग -3
फलटण: पुणे पंढरपूर संत ज्ञानेश्वर पालखी महामार्ग हा हरित महामार्ग बनवण्याचे स्वप्न रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पाहिले होते. परंतु त्यांचे हे स्वप्न RKC इन्फ्रा कंपनीकडून धुळीला मिळवले जात आहे.
हायवेच्या दोन्ही बाजूने देशी वड,पिंपळ ,चिंच अशा प्रकारची झाडे लावण्याची अपेक्षा असताना त्याला बगल देऊन दुसऱ्याच प्रकारचे झाडे नावाला लावली जात आहेत. हायवेच्या दोन्ही बाजूने झाडे लावली जात नाहीत. आगामी येणाऱ्या पालखी सोहळ्याच्यासाठी आळंदी देवस्थानच्या प्रमुखांच्या दौऱ्याच्या वेळी देखाव्यानिमित्त काही झाडे लावली गेली आहेत.
असे न करता देशी झाडे लावून कायमस्वरूपी त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे तरच वारकऱ्यांना त्या झाडांची सावली मिळू शकते.









