अखेर फलटणच्या त्या बोगस दिव्यांग शिक्षकाची केंद्रप्रमुख म्हणून होणारी पदोन्नती रद्द!
जिल्हा परिषदेच्या CEO याशनी नागराजन यांच्या सूचनेनुसार जि. प्रा. शिक्षण अधिकारी अनिस नायकवडी यांची कारवाई!
Ap न्यूजच्या बातमीची दखल :
सातारा: जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी गांधारीची भूमिकेत! मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या भूमिकेकडे खऱ्या दिव्यांगांचे लक्ष!
फलटणल येथील एका प्राथमिक शिक्षकाने बोगस दृष्टीदोष असल्याचे प्रमाणपत्र काढून खात्यांतर्गत केंद्रप्रमुख परीक्षा दिली. व केंद्र प्रमुख म्हणून आज ते पाटण तालुक्यात बढती घेत असल्याचे प्रकरण पुढे आले आहे. खरे तर अशा बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर लाभ घेणाऱ्या लोकांची चौकशी सुरू आहे.
असे असताना सातारा जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी अनीस नायकवडी या प्रकरणावर गांधारीची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. अशा लोकांना साथ देऊन ते खऱ्या दिव्यांगांचे नुकसान करत आहेत.खरे बोगस दिव्यांग ओळखता येत नसल्याने त्यांनाच दृष्टीदोष झाला आहे का हे पाहणे गरजेचे आहे.
या प्रकरणी आता सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या कडूनच खऱ्या दिव्यांगांना न्याय मिळेल अशी अपेक्षा दिव्यांग शिक्षक व्यक्त करण्यात येत आहे.
अशी बातमी आपण केली होती.या बातमीची दखल सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज यांनी घेतली.
या बातमीची दखल घेऊन सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांना या प्रकरणाबाबत सूचना केल्या असता अनिस नायकवडी यांनी सदर बोगस दिव्यांग शिक्षकाची केंद्रप्रमुख म्हणून होणारे नियुक्ती रद्द केली करून दिव्यांग प्रमाणपत्राचे चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणाविषयी पाठपुरावा केल्याबद्दल Ap न्यूज महाराष्ट्रचे संपादक अमोल पवार यांचे खऱ्या दिव्यांग शिक्षकांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.









