खामगाव विजेचा शॉक लागुन ०४ जणांच्या मृत्युप्रकरणी केबलचालका विरुध्द गुन्हा दाखल


खामगाव विजेचा शॉक लागुन ०४ जणांच्या मृत्युप्रकरणी केबलचालका विरुध्द गुन्हा दाखल!

 

फलटण: फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ०८/०७/२०२६ रोजी मौजे खामगाव ता. फलटण जि. सातारा येथे सकाळी ०५.३० वा. सुमारास घराच्या पुढील लोखंडी तारेचा शॉक लागुन एकाच कुटुंबातील १) सतीश ऊर्फ पिसुरडया किसन शिंदे वय ४५ वर्ष, २) गंगु सतीश शिंदे वय ४० वर्ष, ३) सचिन सतीश शिंदे वय २६ वर्ष, ४) आरती सतीश शिंदे वय २४ वर्ष सर्व रा. खामगाव ता. फलटण हे ०४ जण मयत झाले होते. त्याबाबत शितल सचिन शिंदे यांनी दिले तक्रारीवरुन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मयत दाखल करण्यात आले होते.

 

सदर अकस्मात मयताचा पुढील तपास सुरु केला असता सदर तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की फिर्यादी यांच्या घराचे वरुन निष्काळजीपने केबल टाकलेल्या होत्या व त्या केबलवायरला सपोर्ट लावलेली लोखंडी तार हि फिर्यादी यांच्या घरासमोर पडुन त्या तारेला हात लागल्याने वरील चौघांचा जागीच मृत्यु झाला होता. त्यावरुन संबधीत केबल चालक निष्पन्न करुन केबल चालक नामे तात्यासो चंदर लांडगे रा. खामगाव साखरवाडी ता. फलटण याच्या विरोधात फिर्यादी यांनी दिले जबाबावरुन फलटण ग्रामीण पोलीस ठाणेस गु.र.क्र. ४०२/२०२६ बीएनएस कलम १०६(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणामध्ये आणखी कोणाचा निष्काळजीपणा आहे काय? सदर गुन्ह्याचा पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवानी नागवडे या करीत आहेत.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!