पुणे पंढरपूर पालखी मार्गावर फलटण तालुक्यात मेनहोल उघडी,वारकऱ्यांच्या अपघाताची शक्यता!
प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी!
वारीच्या वाटेवर: भाग -1
फलटण: फलटण तालुक्यातील असणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील रस्त्याच्या साईटच्या गटार लाइनवरील मेनहोल उघडी असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या हॉटेल जाई विडणी येथून पुढे फलटण कडे येताना साईटला ही 2मेनहोल उघडे दिसत आहेत.ती ही बंद करण्यात यावेत. जेणे करून इथून मार्गस्थ होणाऱ्या वारकऱ्यांचा रात्री अपरात्री अपघात होऊ नये.
तसेच तालुक्यातील रोडसाइटवरील प्रत्येक ठिकाणाचे संबंधितांकडून पाहणी करून तशी मेनहोल आढळल्यास ती बंद करण्यात यावीत. याविषयी प्रशासनाने लक्ष द्यावे.
Views: 17









