सरडे गावच्या सरपंच पदासाठी राहुल मोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा! गट नेते सुखदेव बेलदार यांच्या भूमिकेकडे संपूर्ण गावाचे लक्ष; राजकीय गणिते बदलणार?


सरडे गावच्या सरपंच पदासाठी राहुल मोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा!

गट नेते सुखदेव बेलदार यांच्या भूमिकेकडे संपूर्ण गावाचे लक्ष; राजकीय गणिते बदलणार?

फलटण (प्रतिनिधी): फलटण तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सरडे गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. यामध्ये ‘सरपंच’ पदासाठी राहुल लाल मोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा गावातील कट्ट्यांवर आणि गल्लीबोळांत रंगू लागली असून, यामुळे सरडे गावच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

राहुल लाला मोरे हे राजे गटाचे अत्यंत कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. सरडे गावचे गट नेते सुखदेव बेलदार यांच्या अतिशय जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या संयमी आणि प्रभावी वक्तृत्वाने गावातील सर्वसामान्य नागरिकांना आपलेसे करणारे एक आश्वासक नेतृत्व म्हणून राहुल मोरे यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्या नावाला सर्वसामान्य जनतेतूनही चांगला पाठिंबा मिळताना दिसत आहे.

सुखदेव बेलदार काय निर्णय घेणार? गावकऱ्यांमध्ये तर्क-वितर्क

सध्या सरडे गावात एकच प्रश्न चर्चिला जात आहे—गट नेते सुखदेव बेलदार हे राहुल मोरे यांना थेट सरपंच पदाची संधी देणार, की त्यांच्या या जवळीकीचा विचार करून त्यांच्या पत्नीला सुद्धा आरक्षित जागेवर दुसऱ्या एखाद्या वार्डमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार?

दुसरीकडे, सुखदेव बेलदार यांच्या राजकीय खेळींबाबत गावकऱ्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. “बेलदार कधी आणि कसे राजकारण बदलतील, हे सांगता येत नाही,” अशी उघड चर्चा सध्या गावातील नागरिक करत आहेत.

‘त्या’ अंतर्गत शब्दाची चर्चा आणि भूतकाळातील आठवणी

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल मोरे यांना सरपंच पदासाठी किंवा महत्त्वाच्या संधीसाठी अंतर्गत पातळीवर ‘शब्द’ देण्यात आल्याची चर्चा सध्या चांगलीच जोर धरू लागली आहे. मात्र, राजकीय वर्तुळात यावरूनही संशयाचे धुके आहे. पाठीमागे राजकारणात झालेल्या काही घडामोडींची आठवण काढत, “यावेळी तरी दिलेला शब्द पाळला जाणार की पूर्वीसारखीच राजकारणात पुन्हा उलथापालथ होणार?” असा सवालही काही जागरूक नागरिक उपस्थित करत आहेत.

एकंदरीत पाहता, सरडे गावचे राजकारण सध्या अत्यंत रंजक वळणावर आले असून, गट नेते सुखदेव बेलदार हे राहुल मोरे यांच्या बाबतीत काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण गावाचे डोळे लागून राहिले आहे.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!