साठे गावचे सुपुत्र राधेशाम खांडेकर सर यांची पाटण तालुक्यातील जिंती येथे केंद्रप्रमुखपदी नियुक्ती
बुद्धिमत्तेच्या जोरावर कष्ट आणि संघर्षातून तयार झालेले व्यक्तिमत्व!
सातारा: साठे ता.फलटण गावचे सुपुत्र श्री.राधेशाम विनायक खांडेकर सर यांची विभागीय केंद्र प्रमुख परीक्षेमधून केंद्र प्रमुख म्हणून पाटण तालुक्यातील जिंती येथे केंद्र प्रमुख म्हणून निवड झाली आहे.
केंद्रप्रमुख म्हणून हजर झाल्याबाबत स्वागत आणि सत्कार पाटण पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी कदम मॅडम यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी मान. पळसे साहेब. आणि गंबरे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.राधेशाम विनायक खांडेकर सर हे आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर कष्ट आणि संघर्षातून तयार झालेले व्यक्तिमत्व आहे!या गोष्टीचा त्यांच्या मित्रपरिवार आणि नातेवाईक यांना अभिमान आहे. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या ज्ञानाचा आणि बुद्धिमत्तेचा नक्कीच उपयोग केंद्रप्रमुख म्हणून होईल.
त्यांचे या निवडीबद्दल साठे गावचे ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षक यांचे वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.









