फलटण–खुंटे रस्ता गेला खड्ड्यात!  राज्यकर्त्यांनी हवेत विमाने उडवण्यापेक्षा तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्येवर काम करणे गरजेचे! 

फलटण–खुंटे रस्ता गेला खड्ड्यात!

राज्यकर्त्यांनी हवेत विमाने उडवण्यापेक्षा तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्येवर काम करणे गरजेचे!

फलटण : फलटण–खुंटे रस्त्याची दिवसेंदिवस होत असलेली दुरवस्था, रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे तसेच रस्त्यालगत वाढलेली झाडी यामुळे येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर *प्रहार दिव्यांग संघटना, फलटण तालुका* व *प्रहार सामाजिक संघटने* च्या वतीने जि.प. बांधकाम विभाग, फलटण येथील उपअभियंता यांना निवेदन देण्यात आले होते.

निवेदनाद्वारे फलटण–खुंटे रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता कायमस्वरूपी व दर्जेदार रस्त्याचे कामकाज हाती घेण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेली झाडी, काटेरी झुडपे व वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वनस्पती तात्काळ काढण्याची मागणीही करण्यात आली.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्याची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेता संबंधित विभागाने तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी ही यावेळी करण्यात आली होती.

यावेळी महेश बापू जगताप, अध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना, फलटण तालुका यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले होते.

परंतु  या घटनेला महिना होऊन देखील प्रशासनाच्या वतीने काहीही कारवाई करण्यात आली नाही. रस्त्याच्या अवस्था जैसे थे आहे. राज्यकर्त्यांनी या नागरिकांच्या मूलभूत समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!