टाकळवाडे ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी सौ.मनिषा गणेश पवार यांच्या नावाची सर्वसामान्य जनतेमध्ये जोरदार चर्चा!
फलटण: राजे गटाचे युवा नेते माजी उपसरपंच पै.गणेश पवार हे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक आहेत.
त्यांनी विविध समाज उपयोगी कामे केलेली आहेत. तरुणांसाठी मोफत ओपन जिम व लहान मुलांच्या हितासाठी खेळणी गावामध्ये उभी केली आहेत. सर्व सामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेत असतात.
आगामी तीन महिन्यावर टाकळवाडे गावचे ग्रामपंचायत निवडणूक लागत आहेत. सरपंच पदे सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील महिलासाठी राखीव आहे. यावेळी राजे गटातील तुल्यबळ सरपंच पदाच्या उमेदवार म्हणून सर्वसामान्य नागरिकांकडून सौ. मनीषा गणेश पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
Views: 29









