झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये! केंद्रीय शिक्षणमंत्री यांचा राजीनामा म्हणजे काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरून केलेल्या आंदोलनाचा मोठा विजय! – महेंद्र सूर्यवंशी (बेडके) अध्यक्ष फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस


झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये!

केंद्रीय शिक्षणमंत्री यांचा राजीनामा म्हणजे काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरून केलेल्या आंदोलनाचा मोठा विजय! – महेंद्र सूर्यवंशी (बेडके) अध्यक्ष फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस

 

 

फलटण: शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या संघर्षाचा, तसेच काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरून केलेल्या आंदोलनाचा मोठा विजय आहे.

 

गेल्या काही काळापासून देशातील शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला होता. NEET, UGC-NET सारख्या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांमधील पेपर लीक प्रकरणे, परीक्षांमधील महाघोटाळे आणि ढिसाळ कारभारामुळे देशातील प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले गेले होते. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या आणि राष्ट्रीय परीक्षा एजन्सीची (NTA) विश्वासार्हता शून्य करणाऱ्या या सर्व प्रकरणांची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी खूप आधीच राजीनामा देणे गरजेचे होते. परंतु, अहंकारी केंद्र सरकारने सुरुवातीला चुका लपवण्याचा प्रयत्न केला.काँग्रेस पक्षाने आणि आदरणीय आमचे नेते राहुलजी गांधी यांनी सातत्याने २०२३ पासून संसद ते रस्त्यांपर्यंत विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद केला. विद्यार्थ्यांवर झालेल्या या अन्यायाविरोधात काँग्रेस पक्षाने तीव्र आंदोलने केली होती करत आहेत. आज अखेर सरकारला नमते घ्यावे लागले असून हा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय आहे.केवळ शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा देऊन हा प्रश्न सुटणार नाही.

आमची मागणी आहे की, शिक्षण व्यवस्थेतील ‘आरएसएस’ (RSS) आणि इतर संस्थांचे अनावश्यक राजकीय हस्तक्षेप सुरू आहे, तो थांबला पाहिजे. तसेच, पेपर लीक प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे विद्यार्थ्यांच्यावर अमानूष लाठीचार्ज केला गेला खोट्या केस केल्या गेल्या त्या संबंधितावर कारवाई झाली पाहिजे आणि भविष्यात परीक्षा पारदर्शक पद्धतीने होतील याची हमी सरकारने दिली पाहिजे. जोपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेस पक्षाचा हा लढा सुरूच राहील.

महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके)अध्यक्ष फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!