जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळज येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळज येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

फलटण:29 जुलै 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळज येथे गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली……

यावेळी इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे मनोभावे स्वागत केले तसेच औक्षणही केले… तसेच आपल्या गुरुंविषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी मनोगतातून गुरूंचे कौतुक केले….

गुरुंचे आपल्या आयुष्यातील स्थान किती महत्वाचे आहे, हे इयत्ता सहावी व सातवीतील विद्यार्थ्यांनी सांगितले….

तसेच

इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी प्रत्येक गुरुचे वैशिष्ट्य सांगितले….

आणि

इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांनी आपले गुरुजी व बाई कशा आहेत हे मनोगतातून सांगितले….

तसेच गुरुदक्षिणा म्हणून मुलांनी वस्तूरूपी भेट दिल्या….

पुष्पगुच्छ, ग्रीटिंग्स तर काहींनी पेढे भरवून तोंड गोड केले……

शाळेचे मुख्या. श्री प्रकाश भोसले सर यांनी गुरु शिष्याच्या नात्याविषयी भावना व्यक्त केल्या तसेच श्री विकास बोंद्रे सर यांनी आपल्या मनोगतातून गुरु-शिष्य परंपरा वैदिक तसेच प्राचीन काळापासून चालत आलेली आहे असे सांगितले….

शाळेचे मुख्या. श्री प्रकाश भोसले सर, श्री विकास बोंद्रे सर, सौ.अर्चना खराडे मॅडम आणि सौ.रूपाली शिंदे मॅडम या सर्वांचाच विद्यार्थ्यांनी यथोचित सत्कार केला व शुभेच्छा दिल्या….

विद्यार्थ्यांनी केलेल्या या सत्कारामुळे सर्व आम्ही शिक्षक वृंद भारावून गेलो….

यामुळे गुरु-शिष्याचे नाते अधिक दृढ झाले…

तसेच जीवन जगण्याची नवीन ऊर्जा व प्रेरणा मिळाली अशा भावना सर्व शिक्षकवृंद यांनी व्यक्त केल्या…

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

32
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

error: Content is protected !!