बरड येथे स्फोटकांचा साठा जप्त! एका आरोपी गजाआड! सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांची धडाकेबाज कामगिरी!


बरड येथे स्फोटकांचा साठा जप्त! एका आरोपी गजाआड!

 

सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांची धडाकेबाज कामगिरी!

 

फलटण : फलटण ग्रामीण पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे बरड गावच्या हद्दीतील रांजणी पुनर्वसन परिसरात कारवाई करत जिलेटीन स्फोटकांनी भरलेला ट्रक जप्त केला. या कारवाईत सुमारे २४ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, या प्रकरणी संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जुलै रोजी गुप्त बातमीदारामार्फत रांजणी पुनर्वसन येथील बंद मराठी शाळेच्या मैदानात दोन दिवसांपासून स्फोटकांनी भरलेला बंदिस्त ट्रक उभा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ व इतर पोलीस कर्मचारी व पंचांसह पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

 

तेथे एमएच ११ सीएच २५५५ क्रमांकाचा टाटा कंपनीचा बंदिस्त दहा चाकी ट्रक आढळून आला. ट्रकजवळ उपस्थित असलेल्या हेमराज महावीर जाट याची चौकशी केली असता ट्रकमध्ये स्फोटकांच्या कांड्यांचे बॉक्स असल्याचे त्याने सांगितले. ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये Ecoprime X 83 mm चे ५०० बॉक्स तसेच Superpower 90 X चे ४ बॉक्स आढळून आले.

 

 

पोलिसांनी स्फोटकांचा साठा, ट्रक आणि रासायनिक विश्लेषणासाठी आवश्यक नमुने असा एकूण २४.७२ लाख रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला.

 

सुरक्षेच्या दृष्टीने जप्त केलेला स्फोटक साठा सुरक्षित मॅगझीनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. चौकशीदरम्यान हा माल शंकरलाल बेनीराम जाट

रा बिलियाका रास्ता भीलवाडा राज्य राजस्थान सध्या राहणार बरड यांचा असल्याचे सांगण्यात आले. Ecoprime स्फोटकांपैकी काही माल वितरित करण्यात आल्याचे सांगितले गेले. मात्र Superpower स्फोटकांबाबत आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. लोकवस्तीच्या परिसरात स्फोटकांनी भरलेला ट्रक निष्काळजीपणे उभा करून मानवी जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी शंकरलाल बेनीराम जाट व हेमराज महावीर जाट रा .बिलिया भीलवाडा राज्य राजस्थान सध्या राहणार बरड यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला असून यातील आरोपी हेमराज जाट याला अटक करण्यात आली आहे.दुसरा आरोपी फरार झाला आहे.

 

 

पुढील तपास पोलिस अमोल चांगण करीत आहेत.


देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

32
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

error: Content is protected !!