फलटण तालुक्यामध्ये पंचायत समिती कडून 7 सेविका,32 मदतनीस यांची भरती प्रक्रिया आजपासून सुरू: उच्चशिक्षित महिलांना सुवर्णसंधी
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2026
फलटण: फलटण तालुक्यातील प्रकल्प फलटण व फलटण २ मधील रिक्त अंगणवाडी सेविका /मदतनीस पदाची भरती
फलटण तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प फलटण व फलटण-२ प्रकल्पातील रिक्त अंगणवाडी सेविका मदतनीस पदांची सरळसेवा भरती प्रक्रिया प्रकल्प कार्यालयामार्फत सुरू करणेत येत आहे. ग्रामपंचायत निहाय रिक्त अंगणवाडी सेविका मदतनीस पदांची यादी.
प्रकल्प फलटण
अंगणवाडी सेविका -१) तावडी-बंडगरवस्ती क्र.१८ २) फरांदवाडी-फरांदवाडी क्र.१२
मदतनीस- १) विंचुणी-अहिवळेवस्ती-क्र.१६ २) साठेगाव-साठेफाटा क्र. २९ ३) दुधेबावी-बोरकरवाडी क्र. ०७ ४) सासकल-सासकल क्र.१२५) निरगुडी-निरगुडी क्र. २७ ६) निरगुडी-निरगुडी क्र. २८ ७) दालवडी-दालवडी क्र. २८ ८) आंदरुड-आंदरुड क्र.१८ ९) मिरवे-कचरेवाडा क्र.०७ १०) मिरढे-मिरढे क्र.०९ ११) मिरवे-शिंदेवाडा क्र.१० १२) वडले-काळेवस्ती क्र.१७ १३) कोराळे-कोराळे क्र.०४ १४) बिबि-धनगरवस्ती क्र.०२ १५) गुणवरे-जिनिंग क्र. २०
प्रकल्प फलटण२
सेविका- १) तरडगाव-परहरखुर्द क्र.१४ २) खराडेवाडी खराडेवाडी क्र.१९ ३) मुळीकवस्ती-मुळीकवस्ती क्र. ३२
४) कोरेगाव-कोरेगाव क्रं. १९ ५) सांगवी सोनगाव बंगला क्रं. १९
मदतनीस – १) विठ्ठलवाडी-विठ्ठलवाडी क्र.३३ २) तरडगाव तरडगाव क्र.०२ ३) नांदल नांदल क्र.२७ ४) तांबवे तांबवे क्र.२५ ५) तांबवे तांबवे क्र.२७ ६) आरडगाव-आरडगाव क्र. १४ ७) मिरेवाडी येळेवस्ती क्र.३१ ८) सोमंथळी-सरकारीमळा क्र.०५ ९) सांगवी-माळेवाडी क्र.१५ १०) खुंटे येळेकाळेवस्ती क्र. ०१ ११) शिंदेवाडी-पाटणेवाडी क्रं.०८ १२) कांबळेश्वर-कांबळेश्वर क्रं.१२ १३) सस्तेवाडी-केंजळेवस्ती क्रं.१७ १४) सस्तेवाडी-महादेवनगर क्रं. २० १५) निंभोरे-निभोरे क्रं.०१ १६) सुरवडी-सुरवडी नं.१२ १७) चौधरवाडी-फलटण सर्कल क्रं.२४
भरती कार्यक्रमाचा अंदाजे तपशील खालीलप्रमाणे
१. विहीत नमुन्यातील अर्ज भरुन देण्याचा दिनांकः-२८/०७/२०२६ ते १०/८/२०२६ (कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस
अर्ज स्विकारण्याचे ठिकाण बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, पंचायत समिती फलटण, फलटण
२. प्राप्त अर्जाची छाननी-११/०८/२०२६ ते १७/०८/२०२६
३. गुणवत्ता पडताळणी समितीची मान्यता घेणे दिनांक-१८ /०८/२०२६ ते २०/०८/२०२६ ४. नोटीस बोर्ड वरील प्रसिध्द यादित्तील उमेदवारा बाबत हरकती/अक्षेप/तक्रारी बाबत शहानिशा करुन गुणवत्ता
यादित सुधारणा करणे दिनांक २१/०८/२०२६ ते ०७/०९/२०२६
५. अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे दिनांक ०८/०९/२०२६
अंगणवाडी सेविका/मदतनिस पदासाठी स्थानिक रहिवाशी आवश्यक असून दोन्ही पदासाठी वयोमर्यादा वय वर्ष १८ ते ३५ व विधवा उमेदवारासाठी कमाल ४० वर्षे राहील तसेच अंगणवाडी सेविका/मदतनिस पदासाठी किमान इ.१२ वी उत्तीर्ण असणे अनिवार्य राहील. तरी तालुक्यातील संबंधित गावातील गरजू पात्र महिलांनी विहीत नमुन्यातील अर्ज परीपुर्ण कागदपत्रासह प्रकल्प कार्यालयाकडे दिलेल्या मुदतीत सादर करायेत. अपूर्ण भरलेला अर्ज तसेच यापूर्वी कार्यालयास सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही व मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा अथवा कागदपत्रांचा विचार केला जाणार नाही. शासनाचे मार्गदर्शक सुचनानुसार उमेदवारांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन त्यांना शैक्षणिक पात्रतेसाठी कमाल ८० व इतर २० गुण, विधवा/अनाथ यांचेसाठी कमाल १० गुण, व अनु जाती/जमातीसाठी ०५ गुण, विमुक्त, भ.ज.जा. इमाव, विमाप्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) सामाजिक व शेक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) साठी कमाल ३ गुण, अंगणवाडी मदतनीस अनुभव २ वर्षेसाठी ०५ गुण देणेत येणार आहे. उमेदवारास त्याने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन १०० गुणापैकी मिळालेल्या गुणांनुसार गुणानुक्रमे एका पात्र उमेदवाराची निवड केली जाणार आहे. “फलटण तालुक्यातील होणारी पदभरती ही शासन निर्णयाच्या अधिन राहून व गुणवत्तेच्या निकषाधारेच होईल, त्या मुळे अर्जदारांनी वशिलेबाजी किंवा इतर कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये… सदर पद भरती संदर्भात आपल्याला कोणत्याही गोष्टीची मागणी केली गेल्यास तात्काळ वा कार्यालयाशी संपर्क साधावा. सदरची पद भरती ही पूर्ण पणे पारदर्शक पणे शासन निर्णय व गुणवत्तेच्या आधारेच केली जाईल” अधिक माहितीसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प फलटण व संबंधित ग्रामपंचायत येथे संपर्क साधावा. काही पदाबाबत अडचणी निर्माण झाल्यास त्यापदाची भरती रद्द करण्याचे अधिकार बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेकडे राखून असतील.
“महिलांनी यासाठी फॉर्म भरण्याचे आवाहन केले असून ही भरती पारदर्शकपणे होणार असल्याचे कोणीही कोणत्याही आमिषाला बळ पडू नये” असे आवाहन प्रियांका हरिश्चंद्र गवळी- बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प फलटण व फलटण-२ यांनी केले आहे.









