आदर्की खुर्द येथील रानडुक्कर शिकार प्रकरणी चार आरोपींना अटक
वनविभागाची धडाकेबाज कारवाई!
फलटण: दि.३०/०७/२०२६ रोजी वनपरिक्षेत्र फलटण मधील मौजे आदर्की खुर्द येथे मिळालेल्या गुप्त माहिती नुसार रात्री ९.०० च्या दरम्यान रानडुक्कर वन्यप्राण्याची शिकार करताना चार आरोपी ताब्यात घेतले असून त्यांचेवर वनरक्षक आदर्की यांचेकडील प्रथम वनगुन्हा रिपोर्ट क्र. 01/2026 अन्वये वन्यजीव व संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम २ (१६), ९,३९,५१ अन्वये वनगुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयातील आरोपींची नावे 1. श्री. सोमनाथ बाळू भंडलकर वय-५० रा. आदर्की खु. ता. फलटण जि.सातारा 2. श्री. अतुल रमेश जाधव वय-२० रा.आदर्की खु. ता. फलटण जि. सातारा 3. श्री. विक्रम संतोष डोंबाळे वय-२४ रा. आदर्की खु. ता. फलटण जि.सातारा 4. श्री. गणेश लक्ष्मण जाधव वय २५ रा. आदर्की खु. ता. फलटण जि.सातारा अशी असून दि.31/07/2026 रोजी मे. प्रथम न्यायदंडाधिकारी यांनी आरोपींना एक दिवसाची वनकोठडी सुनाविली आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत कोणत्याही वन्यप्राण्यांची शिकार करणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. सदर गुन्हयास 3 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा 1 लाखापर्यंतचा दंड किंवा दोन्हीही शिक्षेची तरतूद कायद्यामध्ये आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी यांचेकडून मोबाईल-३ व TVS मोटार सायकल क्र. MH11BU4585 इत्यादी मुद्देमाल जप्त करण्यात आला.
फलटण वनपरिक्षेत्रातील लोकांना आव्हान करण्यात येते की, वन्यप्राणी शिकार करणे, अवैध वाहतुक, अवैध वृक्षतोड तसेच राखीव वनक्षेत्रात अतिक्रमण करणे हे कायद्याने गुन्हा आहे. असे गुन्हे घडल्यास संबंधितांवर वनविभागाकडून कडक कारवाई करण्यात येईल.
सदर कारवाई श्री. अमोल सातपुते, (भा.व.से.) उपवनसंरक्षक वनविभाग सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. दिगंबर जाधव, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) सातारा, निकिता बोटकर, वनपरिक्षेत्र अधिकारी फलटण, श्री. महादेव पाटील वनपाल आदर्की, श्री. सुरज इनकर वनरक्षक ढवळ (अति. आदर्की), श्री. विशाल शिंदे
वनरक्षक वडले तसेच वनपरिक्षेत्र फलटण येथील वनकर्मचारी यांचेसमवेत पार पडली असून पुढील तपास निकिता बोटकर, वनपरिक्षेत्र अधिकारी फलटण करीत आहेत.









