श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय म्हसवड येथे हिंदी भाषेतील महान साहित्यकार मुंशी प्रेमचंदजी यांची जयंती साजरी 

श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय म्हसवड येथे हिंदी भाषेतील महान साहित्यकार मुंशी प्रेमचंदजी यांची जयंती साजरी

फलटण: फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय म्हसवड येथे आज दि. 31जुलै 2026 रोजी हिंदी भाषेतील महान साहित्यकार मुंशी प्रेमचंद जी यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रेमचंदजी यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ.विकास काकडे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या समारंभाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रमेश बोबडे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. विकास काकडे यांनी पुढील आठवड्यात प्रेमचंदजी यांच्या जीवनपटावर भित्तीपत्रिका कार्यक्रमाचे आयोजन करण्यास सुचविले व या प्रमाणे महाविद्यालयातील इतर विभागांनी सुद्धा आप – आपल्या विभागाचे कार्यक्रम घ्यावेत असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या तसेच विभाग प्रमुखांच्या शुभ हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना पेनांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील स्टाफ तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभागाचे सहा. प्रा. डॉ जितेंद्र बनसोडे यांनी केले.

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

33
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

error: Content is protected !!