सभापती पदाच्या निवडणुकीत ओबीसी समाजावर झालेल्या अन्यायाचा निषेध,मी ओबीसी समाजा बरोबर – सागर अभंग
भाजपा ओबीसी फलटण तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे – सागर अभंग , लोकनियुक्त सरपंच विडणी
फलटण: पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला सभापती पदाचे आरक्षण असताना ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची घटना नक्कीच निंदनीय असून या सभापती पदाच्या निवडणुकीत झालेला ओबीसी समाजावर अन्याय मन सुन्न करणारा असून या घटनेचा मी स्वतः *निषेध करीत असून मी माझ्या फलटण तालुका भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.मी पक्षाचा नाही माझ्या ओबीसी समाजाचा आहे.माझा राग कोणत्याही नेत्यांवर नाही किंवा नेतृत्वावर नाही परंतु माझ्या ओबीसी समाजाला सभापती पदाचे आरक्षण असताना का *अन्याय* केला याचे उत्तर मिळाले नाही याचा राग आला असून या सभापती पदाच्या निवडीचा मी जाहीर निषेध करीत आहे.
सागर कांतिलाल अभंग,लोकनियुक्त सरपंच विडणी ,अध्यक्ष भाजपा ओबीसी आघाडी फलटण तालुका









