फलटण -आसू रस्त्यावरील राजाळे गावात स्पीडब्रेकर बसवण्याची शिवसैनिकांची मागणी!
जानाई हायस्कूल व मुख्य चौकात वाढले अपघाताचे प्रमाण
फलटण: नव्याने बनवण्यात आलेल्या आसू फलटण वारुगड या मार्गावरील राजाळे गावांमध्ये सध्या मुख्य चौकात नागरिकांची व जानाई हायस्कूल परिसरात विद्यार्थ्यांची वर्दळ असते.
रस्ता चांगला दर्जाचा झाल्याने वाहनधारकांकडून वेगात वाहने चालवण्याचे प्रमाण वाढले असून यामुळे अपघात प्रमाणात वाढ झाली आहे.
यामुळे मुख्य चौकात व जानाई हायस्कूल येथे स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी राजाळे येथील शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे.तरी संबंधित विभागाने दखल घेऊन यावर कार्यवाही व्हावी.
Views: 27









