२८ फाटा ,दळवी वस्ती,शिंदेवस्ती,भांडवलकर वस्तीची शेतीपंपाची व घरगुती विज समस्या मिटली फलटण तालुका शिवसेनेचे मा.तालुकाध्यक्ष पिंटू इवरे यांच्या प्रयत्नातून ६० लाख रु.निधीतून लिंक लाइन सुरू   

२८ फाटा ,दळवी वस्ती,शिंदेवस्ती,भांडवलकर वस्तीची शेतीपंपाची व घरगुती विज समस्या मिटली

फलटण तालुका शिवसेनेचे मा.तालुकाध्यक्ष पिंटू इवरे यांच्या प्रयत्नातून ६० लाख रु.निधीतून लिंक लाइन सुरू

फलटण: टाकळवाडे सबस्टेशन चालु होऊनमठाचीवाडी,निंबळक,गुणवरे राजाळे,साठे,अशा अनेक गावाना भारनियमन कमी होवुन दिलासा मिळाला आहे.नानासो उर्फ पिंटुशेठ इवरे यांच्या प्रयत्नाने हे सबस्टेशन झाले असून प्रसंगी त्यांनी गुन्हे अंगावर घेतले पण मागे हटले नाहीत.

टाकळवाडे गावातीलच ३-४ वस्त्या २८ फाटा सांगळेवस्ती, गावडे वस्ती इवरेवस्ती,दळवी वस्ती,शिंदेवस्ती,भांडवलकर वस्ती त्यामधुन बाजुला राहिल्या होत्या. या वस्तीवर नियमीत विज पुरवठा होत नव्हता परीणामी शेतकऱ्यांना विज वेळेवर व अनियमीत भेटत होती.लहान मुले व स्त्रीयांचे हाल होते. वारंवार या समस्येला तोंड द्यावे लागत होते. यावेळी अँडशनल भोकरेडिपी,अँडशनेल फुलेवस्ती असे डीपी मंजुर करुन घेतले गेले.

अशातच नियमीत व विजेची मागणी वाढत होती. हीच समस्या घेवुन या वस्तीनसाठी ६० लाख रुपयेची १४ पोल असणारी लिंक लाईन मंजुर करुन घेत सततचा पाठपुरावा व चिकाटीने काम पुर्ण करुन घेत आज लाइन चालु करुन घेतली. यामुळे शेतकरी,गृहणी,तसेच लहानमुले,आता भारनियमनापासुन मुक्त झालेने समाधान व्यक्त करत आहेत.

या कामाचा पाठपुरावा केल्याबद्दल शेतकरी वर्गातुन नानासो उर्फ पिंटु इवरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. लोक धन्यवाद देताना दिसतात कि बळीराजाची काळजी करताना सबस्टेशन आणल,डि.पी.आणले

शेतकरी भारनियमन मुक्त तसेच वेळेवर विज मिळण्यासाठी आपल्या पदाचा उपयोग करत असताना दिसत आहेत.

याकामी म.रा,वि.म.चे.धोत्रे साहेब श्री.ढेंबरे साहेब,श्री.यादव वायरमन यांचे सहकार्य लाभले. त्यांचेही धन्यवाद शेतकरी वर्ग मानत आहे.

यावेळी सोसायटी माजी चेअरमन धनाजी शिंदे,सदस्य रणजित सांगळे, गोरख दळवी,माजी ग्रा.सदस्य बापुराव मुळीक,संदीप झगडे(पाटील), शिवाजी दळवी,शिवाजी बोराटे, नारायण इवरे,सुनिल इवरे,विलास जाधव,सतिश इवरे,आप्पा इवरे,प्रशांत इवरे,अजित इवरे,अभिजीत इवरे,बाळा मिंड,संजय जाधव ,रोहित भांडवलकर, विजय भांडवलकर, महादेव निंबाळकर,

बकस मुलाणी,दयानंद इवरे , सुदाम दरेकर,अविनाश गावडे,भरत दळवी, रमेश भांडवलकर,प्रतिक रिटे, व शेतकरी उपस्थित होते.

” टाकळवाडे गावातील प्रत्येक समस्येला अंगावर घेवुन काम करणार नेतृत्व म्हणजे पिंटू इवरे, लाईट सबस्टेशन,अँडशनल डि.पी, आधुनिक लाईट,झाडे लावणे,साकव पुल,पाणी साठवन बंधारा,तालीम,रस्ते,अंगणवाडी, ग्रामपंचायत नवीन इमारत,विद्यार्थ्याना आधुनिक अभ्यासिका,एस.टी बस सेवा असु द्या. या सर्व समस्येवर उपाय म्हणजे पिंटू इवरे, विकासत्मक, सांस्कृतिक, अध्यात्मिक कामात अग्रेसर असणारे हे नेतृत्व आहे.ते टिकेला विकासाने उत्तर देत असतात.”- रणजित सांगळे,सदस्य टाकळवाडे विविध कार्यकारी सोसायटी

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!