मुरूम येथील अक्षय पवार यांची 4 एकर शेती फलटण महसूल प्रशासनाला हाताशी धरून हडप करण्याचे पुण्यातील सावकाराचे प्रयत्न !
पोलीस प्रशासन दखल घेईना?
न्यायालयाच्या आदेशाने फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
फलटण: मुरूम ता. फलटण येथील शेतकरी अक्षय नारायण पवार यांची शेती फलटण महसूल प्रशासनाला हाताशी धरून लुबाडण्याचे पुण्यातील सावकाराचे प्रयत्न आहेत असे प्रकरण पुढे आलेले असून.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,श्री.अक्षय नारायण पवार, वय 27 वर्षे, व्यवसाय इव्हेंट मॅनेजमेंट, रा. मुरूम, ता. फलटण, जि.सातारा,
यांनी दिलेल्या फिर्यादीवरून,
फिर्यादी वरील ठिकाणी त्यांचे कुटुंबासह राहण्यास असून, फिर्यादीचा डेकोरेशन व्यवसाय आहे. व्यवसायानिमित्त फिर्यादी पुण्यामध्ये मागील 2017 पासून काम करत आहेत. डेकोरेशनच्या कामामधून फिर्यादी यांची आरोपी अशोक ईराप्पा भंडारी, रा- पुणे यांचेशी ओळख झाली होती.
फिर्यादीला डेकोरेशन व्यवसाय वाढवण्यासाठी पैशाची आवश्यकता होती. फिर्यादी यांनी आरोपी यांचेकडुन 6 लाख रुपये व्याजाने घेतले त्याबदल्यात जमिनीचा करारनामा करुन देण्याचे ठरले होते. तसा ड्राफ्ट आरोपीने फिर्यादीला पाठविला होता. परंतु करारनामा करुन घेणेऐवजी आरोपीने फिर्यादीकडुन वटमुखत्यार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी घेतले व संध्याकाळी 5 वाजता फिर्यादी यांचे स्टेट बँकेच्या खात्यावर सहा लाख रुपये पाठविले. त्यानंतर अशोक भंडारी याने मोबाईल वरुन दिनांक 10/09/2024 रोजी आरोपी यांनी फिर्यादी यांना व्याजाचा हप्ता पाठविण्यासाठी आरोपी यांचा कोड पाठविला व दिनांक 11/09/2024 रोजी सकाळी 10.57 वाजता मॅसेज व वॉट्सअप फोन करुन फिर्यादी यांना पाठविलेल्या QR कोडवर व्याजाचा हप्ता पाठविण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने आरोपीने पाठविलेले QR कोडवरती र.रु. 2,000/- व नंतर र.रु. 23.000/- असे एकूण र.रु. 25,000/- व्याजाचा हप्ता पाठविले. त्यानंतर फिर्यादीला ऑक्टोबर 2024 ते मार्च 2025 पर्यंत व्याजाचा हप्ता देता आला नाही. त्यामुळे दर महिन्याला अशोक भंडारी फिर्यादी यास हप्ता मागत.
आरोपी हे मार्च 2025 मध्ये त्याचे सोबत दोन इसम घेवुन फिर्यादीचे घरी मुरुम येथे आले. फिर्यादीस व त्याच्या वडीलांना तुम्ही व्याजाने घेतलेले पैसे व हप्ता द्या नाहीतर मी तुमची जमिन नावावर करुन घेईल अशी धमकी देवून गेले. त्यानंतर मंडलअधिकारी होळ यांची नोटीस आली ती नोटीस बघितल्यावर फिर्यादी व त्याचे वडील यांना मोठा धक्का बसला कारण आरोपी अशोक भंडारी याने फिर्यादीची मौजे मुरुम ता. फलटण, येथील गट नं. 41/5 क्षेत्र 1 है 55 आर या जमिनीचे फिर्यादीस करारनामा करतो सांगुन वटमुखत्यारपत्र करुन घेतले व फिर्यादीची फसवणुक केली होती. सदर मुखत्यारपत्रामध्ये पुर्ण स्टॅम्प ड्युटी न भरता केवळ 500 रुपयांचे चलन भरुन फिर्यादीस समजुतीचा करारनामा ड्राफ्ट वाचायला देवुन त्याऐवजी फिर्यादीच्या जमिनीचे मुखत्यारपत्र फसवुन करुन घेतले व त्या मुखत्यारपत्रावरुन फलटण येथील दुय्यम निबंधक कार्यालय वर्ग 2 यांचेकडे दिनांक 23/04/2025 रोजी खरेदी दस्त फिर्यादीस कोणतीही पूर्व कल्पना न देता लिहून देणार घेणार म्हणून स्वतःच आरोपी अशोक ईराप्पा भंडारी यांनी सही करुन दस्तामध्ये
20 लाख- रुपये दिल्याचे खोटे नमुद करुन अशोक ईराप्पा भंडारी याने खरेदी दस्तातील पान नं. 14 मध्ये फिर्यादी व त्याचे वडील यांची खोटी सही व अंगठा करुन त्यावरती साक्षीदार वैभव एस कामठे व दिपक चव्हाण धायरी पुणे यांच्या सह्या घेवुन सदर आरोपी अशोक ईराप्पा भंडारी यांनी त्यांच्या ऑफिसमधील नंबरवरून मला पाठविलेला समजुतीचा करारनामा हा ड्राफ्ट बदलुन त्यांनी कुलमुखत्यार कुलमुख करुन घेतले व नंतर त्याच जमिनीचा आमच्या परस्पर खरेदीदस्त करुन आमची करोडो रुपयांची जमिन आरोपी अशोक यांनी फक्त सहा लाख रुपयात स्वतःच्या नावावर केली. आरोपी अशोक याने व्याजाचा दुसरा हप्ता देता आला नाही म्हणून फिर्यादीची निळया रंगाची MH-12-NN-9442 हि अॅक्टीव्हा गाडी घेवुन गेला .
सदर तक्रारी अर्जातील नमुद जमिन मौजे मुरुम ता. फलटण, गट नं. 41/5 याचा आरोपी याने फिर्यादीचे कागदपत्रांचा दुरुपयोग करुन बोगस बनावट बेकायदेशीर दस्तऐवज अस्तित्वात आणला व आरोपीने फिर्यादी याचेकडुन व्याजापोटी र.रु. 25,000/- घेतले. राहिलेले व्याजाचा हप्ता देता आला नाही म्हणुन गाडी ठेवून घेतली तसेच फिर्यादीची वडीलार्जीत जमिन लुबाडली याबाबत फिर्यादीने फलटण ग्रामिण पोलिस स्टेशन येथे दिनांक 21/07/2025 रोजी तक्रारी अर्ज दिला. त्याची मुळ प्रत सोबत जोडली आहे. तसेच संबंधीत पोलिस अधिकारी यांनी फिर्यादीचे अर्जाची दखल घेतली नाही म्हणून फिर्यादीने मा. पोलिस अधिक्षक साहेब सातारा यांचेकडे दिनांक 04/08/2025 रोजी तक्रारी अर्ज दिला तरीदेखील फिर्यादी याचा गुन्हा संबंधीत पोलिस ठाणे यांनी दाखल करुन घेतला नाही. त्यामुळे सदर फिर्यादी याचेवरती आतोनात अन्याय होत आहे. त्यामुळे फिर्यादी सत्यप्रतिज्ञेवर कथन करुन मे. न्यायालयामध्ये सदरची दाद मागितली असता न्यायालयाचे आदेशाने फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे करीत आहेत.









