फलटणच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल व कॅम्पस मध्ये 3 लाख 70 हजार रू. वस्तूंचे चोराकडून नुकसान   चोराला 64 हजार किमतीचे साहित्य चोरी करताना रंगेहात पकडले ! संस्थेचे 4 लाख 34 हजार रू.नुकसान


फलटणच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल व कॅम्पस मध्ये 3 लाख 70 हजार रू. वस्तूंचे चोराकडून नुकसान

 

चोराला 64 हजार किमतीचे साहित्य चोरी करताना रंगेहात पकडले !

 

संस्थेचे 4 लाख 34 हजार रू.नुकसान

 

फलटण : घटनास्थळ फलटण पोलीस ठाण्यात मिळालेल्या माहितीनुसार व जबाबानुसार,सौ. निलम मनोहर गायकवाड,प्राचार्य यशवंतराव चव्हाण हायस्कुल फलटण, रा. मलटण,फलटण ता. फलटण, जि. सातारा

 

समक्ष फलटण शहर पोलीस ठाणेस हजर राहुन खबरी जबाब की, मी मी यशवंतराव चव्हाण हायस्कुल फलटण येथे 01/08/2025 रोजीपासुन प्राचार्य म्हणुन काम करीत आहे. आमचे श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण चे यशवंतराव चव्हाण हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, सौ. वेणुताई चव्हाण गर्ल्स हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, सौ. वेणुताई चव्हाण डि फार्मसी कॉलेज, नामदेवराव सुर्यवंशी बेडके महाविद्यालय अशा संस्था एकाच आवारात आहेत.

 

आमचे संस्थेच्या सुरक्षेसाठी आम्ही वॉचमन ठेवलेला आहे तो नाना पाटील चौकाचे बाजुला शाळेचे गेटवर वॉचमन केबीनमध्ये असतात.

 

दिनांक-18/05/2026 रोजी 16.30 वाजणेचे सुमारास मला शाळेमधुन फोन आला की, शाळेमध्ये एक इसम 15.00 वाजता शिरला आहे त्याने आपल्या शाळेमधिल वस्तुंचे नुकसान करुन तोडफोड केली आहे. व तो तेथे झोपला आहे. म्हणुन त्या रुमला बाहेरुन कडी लावलेली आहे. म्हणुन मी शाळेमध्ये जाउन पाहीले असता बीए च्या वर्गामध्ये आतमध्ये एक इसम गेलेला होता म्हणुन आम्ही पोलीसांना फोन केला व त्यास उठवुन नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव रोहीत शिंदे रा. शिवाजीनगर फलटण ता. फलटण असे असलेचे सांगीतले. त्यानंतर आम्ही शाळेमध्ये त्याने तोडफोड करुन नुकसान केलेल्या वस्तु पाहील्या त्यामध्ये त्याने महाविद्यालयातील संस्थेच्या शेजारच्या ऑफिसमधील दोन तयार केलेल्या काचेच्या केबीन रुपये किंमत 3,00,000/- रुपये किंमतीचे सामान तोडुन नुकसान केले आहे. तसेच शाळेतील 1. मर्क्युरी किंमत 9,000/-, 2. युरीनची 6 भांडी किंमत 6,000/- रुपये, 3. टॉयलेटचे भांडे 5000/-रु., 4. टॉयलेटवरील युनिट त्यामधील पत्रा, अॅन्गल, दरवाजा असे असलेले दोन युनिट किंमत 20,000/- रुपये, 5. सीसीटीव्ही कॅमेरे किंमत 10,000/-रुपये, 6. लोखंडी खिडकी किंमत 11,000/- रुपये, 7. लोखंडी बॅनर फ्रेम किंमत 9,000/- या सामानाचे नुकसान केलेले आहे असे एकुण 3,70,000/- रुपयांचे सामानाचे तोडफोड करून नुकसान केले आहे. तसेच या इसमाने यापुर्वी इमारतीच्या आवारातुन पुढील वर्णानाचे सामान चोरुन नेले ते पुढीलप्रमाणे 1.20 नग पाण्याचे नळ किंमत अंदाजे 10,000/- रुपये, 2. संगणक 2 नग किंमत 30,000/- रुपये, 3. पाण्याची टाकी किंमत 16,000/- रुपये, 4.10 किलो वजनाची पितळी घंटा किंमत 4,000 रुपये, 5. स्लॅपवरील भंगार किंमत 1,000/-रु. 6. पितळी समई 3 फुटी 1,000/-रु., असे एकुण 62,000/- रुपयांचे सामान दि. 07/08/2025 ते दि. 18/05/2026 रोजी पर्यंत चोरुन नेले आहे.

 

तरी दि. 07/08/2025 ते दि. 18/05/2026 चे 15.00 ते 16.30 वा. चे दरम्यान नामदेवराव सुर्यवंशी महाविद्यालय, फलटण ता. फलटण जि. सातारा येथुन महाविद्यालयाचे वर्गामधील व आवारातुन इसम नामे रोहीत मनोज शिंदे रा. शिवाजीनगर फलटण ता. फलटण जि. सातारा याने एकुण 3,70,000/- रु. किंमतीचे केबीन व इतर साहित्य तोडफोड करुन नुकसान केले आहे. तसेच महाविद्यालयातील संगणक, नळ, पितळी घंटा व भंगार सामान असे एकुण 62,000/- रुपये किंमतीचे चोरुन नेले आहे.

 

आरोपीला अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष कदम हे करीत आहेत.


आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!