संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !
पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! -योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान
मला तोडू नका:भाग -3
फलटण: फलटण येथील गजानन चौकातील संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावरील रस्त्याचे काम सुरू असून या ठिकाणी अनेक झाडे आहेत, त्यावर पक्षी घरटी करून राहत आहेत. हा अधिवास नष्ट करणे यथोचित होणार नाही.
नगरपालिकेने आळंदी देवस्थानकडे अंगुलीनिर्देश केल्यानंतर आमच्या प्रतिनिधींनी विश्वस्त योगी निरंजननाथ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की आम्ही आळंदी देवस्थानचे कोणतेही विश्वस्त ,पालखी सोहळा प्रमुख पालखी मार्गावरील झाडे तोडावी असे कधीही म्हणणार नाही. संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा झाडाविषयी प्रेम दाखवले आहे. आम्ही त्यांच्याच मार्गावर चालत आहोत असे ते म्हणाले.
यानंतर सदर झाडे तोडणे अथवा तसे ठेवणे हे फलटण नगरपालिके वरती अवलंबून आहे. वनप्रेमी व नागरिकांकडून पालिकेला झाडे न तोडणे बाबत विनंती करण्यात आली आहे.
क्रमश……








