Dysp कार्यालय फलटणच्या उशाला!
अवैध काळे धंदे फलटणकरांच्या नशिबाला!
Dysp विशाल खांबातून बाहेर येऊन आपल्या शक्तीद्वारे नरसिंह अवतार घेऊन अवैधधंदेरुपी हिरण्यकश्यपूचा वध करणार का?
फलटणचे अवैध काळे धंदे – भाग 2
फलटण: फलटण हे मागील काही दिवसांपूर्वी डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्रभर गाजले होते.यामध्ये असणारा आरोपी हा पोलिस होता यामुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलिन झाली होती.
सध्या फलटण शहरात अनेक अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू आहे.यामध्ये मटका, चक्री,जुगार,ताडी विक्री,अनेक लॉज वर सुरू असणारा अवैध वैश्या व्यवसाय हे काळे धंदे बिनबोभाट सुरू आहेत.यावरती फलटण शहर पोलिस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.
फलटण येथे उपविभागीय पोलीस अधीक्षक (Dysp) यांचे कार्यालय असून येथे विशाल खांबे हे अधिकारी कार्यरत आहेत.असे असले तरी त्यांची भूमिका ही अवैध काळे धंद्याबाबत निष्क्रीय दिसून येत आहे. रस्त्यावरती खुले आम जुगार सुरू आहे.फलटण मध्ये चाललय काय?रोड रोमिओ गाड्या जोरात सायलेन्सरचा आवाज करत गाडी चालवत आहेत. निर्भया पथक नावालाच दिसून येत आहे. गावगाड्याकडून शिक्षणासाठी येणाऱ्या मुली सुरक्षित भयमुक्त आहेत का? त्यांच्या शाळा रोड, परिसरात उनाड मुले ही थांबलेली असतात.यावर पोलिस बघ्याची भूमिका घेत असतात.प्रत्येक वेळी अनुचित घटना घडल्यावरच पोलिस जागे होणार का?
फलटण शहर वासियांना आता असे म्हणावे लागत आहे की,Dysp कार्यालय फलटणच्या उशाला!
अवैध काळे धंदे फलटणकरांच्या नशिबाला!
Dysp विशाल खांबातून बाहेर येऊन आपल्या शक्तीद्वारे नरसिंह अवतार घेऊन अवैधधंदेरुपी हिरण्यकश्यपूचा वध करणार का?हे पाहणे आगामी काळात उत्सुकतेचे ठरणार आहे.
क्रमशः …………









