दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणूक व जनगणना काम देऊ नये प्रहार दिव्यांग कर्मचारी संघटनेकडून फलटणच्या तहसीलदारांना निवेदन


दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणूक व जनगणना काम देऊ नये

प्रहार दिव्यांग कर्मचारी संघटनेकडून फलटणच्या तहसीलदारांना निवेदन

 

फलटण: शासन नियमाप्रमाणे दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणूक व जनगणना काम न देणे बाबत नुकतेच प्रहार दिव्यांग शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेकडून फलटणचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार तुषार गुंजवटे यांनी हे निवेदन स्वीकारले

 

 

 

निवेदनात म्हटले आहे की,वरील विषयी विनंतीपूर्वक कळवू इच्छितो की शासन परिपत्रकाप्रमाणे, नियमाप्रमाणे, दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे व जनगणनेचे कोणतेही काम देण्यात येऊ नये असे आदेश आहेत. दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या व जनगणनेच्या कामामध्ये खूपच अडथळे निर्माण होतात, शारीरिक, मानसिक त्रास होतो.

 

त्यामुळे शासनाने त्यामधून दिव्यांग कर्मचाऱ्यांना सूट देण्यात यावी असे आदेश काढलेले आहेत.

 

तरी कृपया दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे, जनगणनेचे काम देण्यात येऊ नये अशी आपणास विनंती आहे.यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

निवेदनावरती प्रहार दिव्यांग शासकीय नियम शासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेचे फलटण तालुकाध्यक्ष विकास बोंद्रे, सचिव आनंदराव गोळे यांच्या सह्या आहेत.


34
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!