निरगुडी गावातील दलित वस्तीशेजारील बांधकाम सुरू असणाऱ्या संरक्षणभिंतीची उंची वाढवा  पावसाळ्यात घरात शिरते ओढ्याचे पाणी   प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी- सामाजिक कार्यकर्ते महेंद्रदादा गोरे यांची मागणी    


निरगुडी गावातील दलित वस्तीशेजारील बांधकाम सुरू असणाऱ्या संरक्षणभिंतीची उंची वाढवा

पावसाळ्यात घरात शिरते ओढ्याचे पाणी

प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी- सामाजिक कार्यकर्ते महेंद्रदादा गोरे यांची मागणी

 

फलटण: निरगुडी गावातील होलार व बौद्ध वस्ती शेजारी मंजूर झालेल्या संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे. लवकरच काही दिवसांत हे काम पूर्ण होईल.

 

सध्याची मंजूर झालेल्या संरक्षण भिंतीची उंची ३ मीटर इतकी आहे.

परंतु वस्ती शेजारील परिस्थिती पाहता ही उंची खूप कमी आहे.

पावसाळ्यामध्ये पाण्याची पातळी खुप मोठी असते. त्यामुळे पावसाळ्यात दलित वस्तीमध्ये पाणी शंभर टक्के घुसणार आहे. त्यामुळे आठ ते दहा घरे पुर्ण पाण्याखाली जाणार आहेत. महिला -पुरुष-लहान मुले-जनावरे यांचे जीविताला शंभर टक्के धोका आहे.

येणाऱ्या 2026 मधील पावसाळ्यात निरगुडी गावातील अनुसूचित जातीतील होलार व बौद्ध वस्तीतील जिवीत व वित्त हानी टाळण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत वाढीव २ मीटर उंच भिंत बांधून देण्याशिवाय पर्याय नाही.

त्यामुळे सदर काम सुरू असलेल्या संरक्षण भिंतीच्या कामाची पाहणी करून भिंतीची उंची २ मीटर इतकी वाढवून देण्यात यावी.

अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे, देवराज गोरे, अजित गोरे, आदेश गोरे,लहु गोरे यांनी उप अभियंता सातारा जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग फलटण,प्रांतअधिकारी, तहसील कार्यालय, पंचायत समिती फलटण येथे देण्यात आले.

 

यावेळी सदर संरक्षण भिंतीची उंची तेथील पाण्याची पातळी लक्षात घेता कमी आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत दलित वस्तीतील नागरिकांची जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी उंची वाढवणे गरजेचे आहे.

       यासाठी लवकरच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आमदार, खासदार, पालकमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे यांनी सांगितले.

WPADMIN

34
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!