विडणी येथून एकजण बेपत्ता
फलटण: विडणी ता.फलटण येथील एक दहावीतील मुलगा बेपत्ता झाला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाणेमधून मिळालेल्या माहितीनुसार व जबाबानुसार मी मयुर विजय जगताप वय-40 वर्षे व्यवसाय-मजुरी रा.मांगोबामाळ विडणी ता.फलटण जि. सातारा वरील ठिकाणचा रविवासी आहे.माझा मुलगा शंतनु मयूर जगताप वय-16 इयत्ता 10 वी असे
दिनाक 10/02/2026 रोजी मी सकाळी 09.00 वा चे सुमारास कामासाठी बारामती येथे गेलो. त्यानंतर माझा मुलगा शंतनु हा नेहमी प्रमाणे सकाळी 11.00 वाचे सुमारास त्याचे दप्तर घेवुन मी शाळेत जातो असे त्याची चुलती सोनम हीस सांगुन गेला होता. त्यानंतर सायंकाळी 4.30 वाचे सुमारास मी घरी आलो. त्यानंतर सायंकाळी 6.00 वाजले तरी मुलगा शंतनु घरी आला नाही म्हणुन मी त्याची चौकशी करणेसाठी त्याचे मित्र अनिकेत मदने, चैतन्य मदने यांना फोन करुन मुलगा शंतुनबाबत विचारणा केली असता त्यानी मला सांगीतले की आज शंतनु शाळेत आला नव्हता. त्यानंतर मी मांगोबामाळ, विडणी, फलटण, निरा, माळशिरस येथे शोध घेतला परंतु तो कोठेच मिळुन आला नाही. यावरून माझी अशी खात्री झाली की कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून माझे मुलास फूस लावून पळवून नेहला असावा.
तरी दिंनाक 10/02/2026 रोजी सकाळी 11.00 चे सुमारास मौजे मांगोबामाळ विडणी ता. फलटण गावचे हददीतुन माझे रहाते घरातुन माझा मुलगा प्रशंतनु मयुर जगताप वय 16 वर्षे रा. मांगोबामाळ विडणी ता फलटण जि सातारा ह्याला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून पुस लावून पळवून नेहला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण करीत आहेत. कोणाकडे माहिती मिळाल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आव्हान पोलिसांकडून करण्यात आले आहे.









