टाकळवाडे येथील शेतकऱ्याचे परस्पर शेत नांगरले! एकावर गुन्हा दाखल


टाकळवाडे येथील शेतकऱ्याचे परस्पर शेत नांगरले!

एकावर गुन्हा दाखल

 

फलटण: टाकळवाडे तालुका फलटण येथील एका शेतकऱ्याचे परस्पर शेत नांगरले म्हणून एकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

 

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, व दिलेल्या फिर्यादीवरून,तक्रारदार उत्तम जयसिंग मिंड रा. टाकळवाडे यांचे गट नंबर 73 मध्ये शेती क्षेत्र असून या क्षेत्रात दिनांक 9 मार्च 2026 रोजी 4 वा. दिपक सोपानराव फुले हे ट्रॅक्टरने शेती नांगरट करत होते. यावेळी उत्तम मिंड यांनी तुम्ही आमचे शेतात नांगरट करू नका असे म्हणलेचे कारणावरून दिपक फुले याने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार दाखल झाली आहे.

 

याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस हवालदार सागर अभंग करीत आहेत.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!