बरड जिल्हा परिषद शाळेतील  विद्यार्थ्यांचे यश. स्वराज एकळ याला धावण्याच्या स्पर्धेत गोल्ड मेडल


बरड जिल्हा परिषद शाळेतील  विद्यार्थ्यांचे यश.

स्वराज एकळ याला धावण्याच्या स्पर्धेत गोल्ड मेडल

फलटण: डेरवण युथ गेम 2026 या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये बरड जिल्हा परिषद शाळेतील स्वराज सोमनाथ एकळ या तिसरीतील विद्यार्थ्याने 80 मी धावणे स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल व 50 मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून सिल्वर मेडल मिळवले आहे.

 

त्याला ए.के. अँथिलेटिक्स अकॅडमी बरडचे संस्थापक श्री.अजित पोपट कर्णे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

 

या महत्त्वपूर्ण यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी चन्नया मठपती,केंद्रप्रमुख श्री.धुमाळ, मुख्याध्यापक श्रीनाळे सर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री बापूराव गावडे,व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, लोकनिर्वाचित सरपंच श्री.प्रकाश लंगूटे,सर्व ग्रामपंचायत सदस्य,बरड ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी पालक ,शाळेतील सर्व शिक्षक स्टाफ यांनी यशस्वी खेळाडूंचे कौतुक केले व पुढील क्रीडा क्षेत्रातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. व मार्गदर्शक ए.के. ॲथलेटिक्स अँकॅडमीचे श्री अजित कर्णे सर यांचेही अभिनंदन करण्यात आले.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!