प्रहार दिव्यांग संघटनेचे फलटण तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी भर उन्हात आमरण उपोषण सुरू!
प्रशासन राज्यकर्त्यांच्या पुढे- पुढे करण्यात व्यस्त!तर फलटणचे आमदार सचिन पाटील सोशल मीडियावर फोटो काढून टाकण्यात मस्त!
फलटण: फलटण तहसील कार्यालयासमोर भर उन्हात प्रहार दिव्यांग संघटनेचे विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू आहे.
वर्षभरापूर्वी झालेल्या अतीवृष्टीने ज्या शेतकऱ्यांचे खरे नुकसान झाले आहे.त्यांना नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही. ती नुकसान भरपाई मिळावी. संजय गांधी निराधार अनुदान योजना येथे 3 पदे असताना 3 पदे भरलेली नाहीत. एका टेम्पररी महिलेवर हे कार्यालय चालू आहे.तेथे कर्मचारी व अधिकारी यांची नेमणूक करावी. दिव्यांग बांधवांना घरकुल साठी जागा मिळावी, रेशनिंगचे प्रश्न सुटावेत. या सह विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू असून .आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष विकास नाळे यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे.
एकूणच फलटण प्रशासन हे गांधारीची भूमिका घेत असताना दिसत आहे. राज्यकर्त्यांच्या पुढे पुढे करण्यातच व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. दिव्यांग बांधव, विधवा महिला यांचे प्रश्न सोडवण्यासाठी फलटणचे आमदार सचिन पाटील यांची ही भूमिका काम करण्याची दिसून येत आहे. फक्त आमदार मीटिंग घेत असल्याचे दिसून येत आहेत. व घेतलेल्या मीटिंगचा फक्त सोशल मीडियावर मोठेपणा व्यक्त करताना दिसून येत आहेत. त्यांनी फलटण तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवावेत अशी भूमिका दिव्यांग संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.









