विडणी येथील हॉटेल जाई येथे राडा! भाकरी वाढण्याच्या कारणावरून हाणामारी

विडणी येथील हॉटेल जाई येथे राडा!

भाकरी वाढण्याच्या कारणावरून हाणामारी

फलटण ता. ११ : विडणी ता. फलटण येथील जाई हॉटेलमध्ये भाकरी वाढण्याच्या कारणावरून वाद झाल्याने एकास चार जणांकडून बेदम मारहाण केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विडणी (ता. फलटण) गावच्या हद्दीमध्ये असलेल्या जाई हॉटेलमध्ये प्रकार घडला आहे.

घटनास्थळ व फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती पुढील प्रमाणे, रविवारी (ता. १०) रात्री दहाच्या सुमारास विडणी (ता. फलटण) गावच्या हद्दीमध्ये असलेल्या जाई हॉटेल येथे भाकरी वाढण्याच्या कारणावरून वाद होऊन यातील प्रवीण जाधव (पूर्ण नाव माहित नाही) रा. सोमवार पेठ, फलटण (ता. फलटण) यांनी खुर्ची उचलून अभिजीत अशोक आढाव (वय – ३२) रा. गुणवरे , ता. फलटण यांच्या डोक्यात मारून जखमी केले व त्यांच्यासोबत असलेल्या इतर तीन लोकांनी हाताने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली. म्हणून यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी खबर अभिजीत अशोक आढाव यांनी दिली आहे. या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार वावरे करत आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!