ग्रामपंचायत विडणी येथील चहापान खर्च प्रकरणातील विसंगतींच्या निष्पक्ष चौकशीसाठी उपोषणास्त्र! भर उन्हात आम आदमी पार्टीचे पंचायत समिती फलटण येथे उपोषण सुरू!


ग्रामपंचायत विडणी येथील चहापान खर्च प्रकरणातील विसंगतींच्या निष्पक्ष चौकशीसाठी उपोषणास्त्र

भर उन्हात आम आदमी पार्टीचे पंचायत समिती फलटण येथे उपोषण सुरू

फलटण: ग्रामपंचायत विडणी, ता. फलटण, जि. सातारा येथील चहापान खर्च प्रकरणाबाबत दिनांक 03/06/2026 रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती फलटण यांना लेखी तक्रार देऊन 7 दिवसांच्या आत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाने वेळ मागितल्याने अतिरिक्त वेळ देण्यात आला.

 

त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने दिनांक 09/06/2026 रोजी पुन्हा लेखी निवेदन देऊन दिनांक 17/06/2026 पर्यंत कारवाई न झाल्यास आंदोलन व उपोषण सुरू करण्याचा इशारा देण्यात आला होता.

 

सदर प्रकरणात माहिती अधिकार कायद्यांतर्गत 10 मुद्द्यांवर माहिती मागविण्यात आली होती. मात्र संबंधित कार्यालयाने फक्त मर्यादित माहिती देऊन उर्वरित मुद्द्यांवरील माहिती उपलब्ध करून दिलेली नाही.

 

प्राप्त माहितीनुसार ₹8,500 चे एक बिल सादर करण्यात आले असून त्यामध्ये 1700 कप चहा @ ₹5 प्रति कप असा उल्लेख आहे. या बिलावर 30/11/2023 ही तारीख नमूद आहे.

 

यासंदर्भात खालील गंभीर विसंगतींची चौकशी होणे आवश्यक आहे :

 

1. संबंधित बिलावर 30/11/2023 ही तारीख असताना संबंधित ग्रामसभा 01/12/2023 रोजी झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

2. पत्रकार परिषदेमध्ये संबंधितांनी 01/12/2023 रोजी ग्रामसभा झाल्याचे मान्य केले आहे.

3. त्याच पत्रकार परिषदेमध्ये हे बिल 3 ते 4 महिन्यांचे “क्रेडिट बिल” असल्याचे सांगण्यात आले.

4. मात्र माहिती अधिकारातून नंतर उपलब्ध करून दिलेल्या तपशीलात जानेवारी 2023 ते नोव्हेंबर 2023 या सुमारे 11 महिन्यांच्या कालावधीचा खर्च दाखविण्यात आला आहे.

5. 30/11/2023 रोजी तयार करण्यात आलेल्या बिलावर “ग्रामसभा चहापान” असा उल्लेख असल्याचे निदर्शनास आले आहे, तर नंतर सादर केलेल्या तपशीलात विविध ग्रामसभा, मासिक सभा व इतर बैठकींचा खर्च समाविष्ट करण्यात आलेला दिसून येतो.

6. माहिती अधिकार अर्जातील सर्व मुद्द्यांची संपूर्ण माहिती अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

 

वरील बाबींमुळे उपलब्ध अभिलेख, सार्वजनिक विधाने आणि माहिती अधिकारांतर्गत प्राप्त माहिती यामध्ये गंभीर तफावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.

 

मागण्या :

 

1. चहापान खर्च प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.

2. विशेष लेखापरीक्षण (Special Audit) करण्यात यावे.

3. मूळ बिले, व्हाउचर, ठराव पुस्तिका, उपस्थिती नोंदवही व आर्थिक अभिलेखांची पडताळणी करण्यात यावी.

4. माहिती अधिकार अर्जातील उर्वरित माहिती तात्काळ उपलब्ध करून द्यावी.

5. चौकशीत अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी.

वरील मागण्यांसाठी दिनांक 17 जून 2026 पासून आंदोलन व उपोषण सुरू करण्यात येत आहे.

 

– अनिकेत किसन नाळे,  सामाजिक कार्यकर्ते  ग्रामपंचायत विडणी, ता. फलटण, जि. सातारा


24
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!