सरडे येथे अवैद्य दारू विक्रेत्यावर कारवाई!  फलटण ग्रामीण पोलिसांचे पूर्व भागात अवैध दारू विक्रेत्यांवर सातत्यपूर्ण धाडसत्र! महिला वर्गातून लाडक्या पोलिस भावांचे अभिनंदन.


सरडे येथे अवैद्य दारू विक्रेत्यावर कारवाई!

फलटण ग्रामीण पोलिसांचे पूर्व भागात अवैध दारू विक्रेत्यांवर सातत्यपूर्ण धाडसत्र! महिला वर्गातून लाडक्या पोलिस भावांचे अभिनंदन.

 

फलटण: फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,

दिनांक 14/06/2026 रोजी 17:00 वा.चे सुमारास मी तसेच पो. हवा. ओंबासे , पो. ह. खरात आम्ही सर्व पोलीस ठाणे मध्ये हजर असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुबनावळ सो. यांनी त्यांचे कक्षात समक्ष बोलावून घेवून कळविले की, बातमीदारा मार्फत बातमी मीळाली आहे की, मौजे सरडे ता. फलटण गावचे हद्दीत इसम नामे बाळासो मारुती भंडलकर रा. सरडे ता. फलटण जि. सातारा हा त्याचे घराच्या आडोशाला देशी दारुची बेकायदा, बिगरपरवाना चोरटी विक्री करीत आहे. तरी सदर ठिकाणी छापा टाकणेचा आहे, असे सांगीतले.

 

म्हणून पोलीस हवा. ओंबासे यांनी लागलीच दोन पंचांना फलटण ग्रामीण पोलीस ठाणे या ठिकाणी बोलावून घेतले. त्यांना मिळाले बातमीचा आशय समजावून सदर रेड कामी पंच म्हणून हजर राहणेस विनंती केली. सदरचे पंच स्वखुशीने रेडकामी बरोबर येण्यास तयार झाल्यावर आंम्ही पोलीस स्टाफ, पंच व रेडसाठी लागणारे साहित्य सोबत घेवून सरकारी वाहनाने फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथून मौजे सरडे ता. फलटण जि. सातारा गावी मिळाले बातमीचे ठिकाणी निघालो. सरडे गावचे अलीकडे आमचे सरकारी वाहन आडोशास पार्क करुन आंम्ही पायी चालत मिळाले बातमीचे ठिकाणी निघालो. सदर ठिकाणी अचानकपणे 18:45 वा.चे सुमारास छापा टाकला असता तेथे एक इसम आपले पुढ्यात एक पांढरे रंगाचे पिशवी घेवून बसलेला दिसला. त्यास जागीच पकडून त्याचे नाव गाव विचारता त्याने आपले नाव बाळासो मारुती भंडलकर वय 45 वर्षे रा. सरडे ता. फलटण जि. सातारा असे सांगीतले. त्यांचेकडे असले पांढरे पिशवी मध्ये काय आहे असे विचारले असता त्याने त्यामध्ये देशी दारु सखु संत्रा असे असलेचे सांगीतले. सदर इसमास त्याबाबत त्याचेकडे कोणता परवाना आहे का असे विचारले असता त्याने कसलाही परवाना नसलेचे सांगीतले. यावरुन तो बेकायदेशीर दारु विक्री करीत असलेचे आढळून आले. त्याचे ताब्यात मिळून आले मालाचे वर्णन खालीलप्रमाणे.

 

1) 800/- एक पांढरे रंगाचे पिशवी त्यामध्ये देशी दारु सखू संत्रा टॅगो पंच असे लेबल असलेल्या प्रत्येकी

 

180 मिलीच्या प्लास्टीकच्या एकुण 10 सिलबंद बाटल्या प्रत्येकी किंमत 80/-रु. 2) 00:00/ अ. क्रमांक 1 मधून 1 देशी दारु सखू संत्रा टँगो पंच असे लेबल असलेली एक सिलबंद बाटली

 

800/-रु. सी.ए सॅम्पलरकरीता काढून घेतली ती.

 

येणेप्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा प्रोव्हीबिशन माल मिळून आला. त्याचा सोबत आणले दोन पंचांसमक्ष पोलीस हवा ओंबासे यांनी पंचनामा करुन त्यास पंचांचे व पोलीसांचे सह्याची कागदी लेबले लावून जागीच लाखी सिल करुन गुन्हाचे तपासकामी जप्त केला आहे.

 

तरी ता. 14/06/2026 रोजी 18:45 वा. चे सुमारास मौजे सरडे ता. फलटण गावचे हद्दीत बाळासो मारुती भंडलकर वय 45 वर्षे रा. सरडे ता. फलटण जि. सातारा हा आपले घराच्या आडोश्याला उघड्‌यावर बेकायदा, बिगरपरवाना स्वतःचे आर्थिक फायद्या करीता देशी दारुची चोरटी विक्री करीत

असताना 800/-रु. किंमतीचा प्रोव्हीबिशन माल आपले कब्जात बाळगले स्थितीत मिळून आला.

 

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस हवालदार शांतीलाल ओंबासे करीत आहेत.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!