सोनगाव सोसायटीमधून जिल्हा बँकेसाठी राजे गटाचे जेष्ठ नेते माजी सरपंच जयाप्पा बेलदार यांच्या नावाचा ठराव
फलटण: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोनगाव बंगला तालुका फलटण येथील विकास सेवा सोसायटी मधून राजे गटाचे जेष्ठ नेते माजी सरपंच जयाप्पा बेलदार यांच्या नावाचा बिनविरोध ठराव करण्यात आला आहे.
या निवडी नंतर विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर , राजे गट व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले
Views: 19









