राजाळे सोसायटी मधून जिल्हा बँकेसाठी भाजपचे नेते माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांच्या नावाचा ठराव
फलटण: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राजाळे ता. फलटण येथील विकास सेवा सोसायटी मधून भारतीय जनता पक्षाचे नेते माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांच्या नावाचा ठराव बिनविरोध करण्यात आला आहे.
माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांच्या नावाचा ठराव झाल्यानंतर त्यांचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर,आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर ,स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीतभैया निंबाळकर आदींसह राजाळे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
Views: 15









