फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत ‘डीजे मुक्त मिरवणूक’ व ‘एक गाव,एक गणपती’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद 15 गावात एक गाव एक गणपती तर 34 गावात डिजेमुक्त मिरवणूका

फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत ‘डीजे मुक्त मिरवणूक’ व ‘एक गाव,एक गणपती’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

15 गावात एक गाव एक गणपती तर 34 गावात डिजेमुक्त मिरवणूका

फलटण: मा. पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत शांतता, सामाजिक सलोखा व पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत.

फलटण ग्रामीण हद्दीतील एकूण 34 गाव –

मुंजवडी, उपळवे, काशीदवाडी, वडले, शेरे शिंदेवाडी, मठाचीवाडी, सरडे, वडजल, निंबळक, मुरूम, तातवडा, तिरकवाडी, खडकी, गिरवी, राजाळे, सोनवडी बुद्रुक, ढवळेवाडी (निंबोरे), मानेवाडी, वाघोशी, पिराचीवाडी, नाईकबोमवाडी, धुमाळवाडी सासकल, भाडळी बुद्रुक, आंदरुड, वाखरी, ढवळेवाडी (आसू), विंचुरणे, कुरवली बुद्रुक, राजुरी, मिरगाव, शिंदेनगर, टाकळवाडे आणि दालवडी या गावांनी डीजे मुक्त गणेशोत्सव मिरवणुकीचा,

तर १५ गावात एक गाव एक गणपती

शेरेचीवाडी, मानेवाडी, झडकबाईचीवाडी, ताथवडे, पिराचीवाडी, भाडळी बुद्रुक, तिरकवाडी, जाधववाडी, सावंतवाडी, राजाळे, धुमाळवाडी, काशीदवाडी, गोळेवाडी, मांझेरी आणि उपळवे गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमाचा सकारात्मक निर्णय घेतला आहे.

या उपक्रमामुळे ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण, सामाजिक एकोपा वाढविणे, पारंपरिक संस्कृतीचे जतन व शांततामय वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.

सर्व गणेश मंडळे व नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून शांततामय, सुरक्षित व आदर्श गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

“एक गाव – एक विचार – एक उत्सव; डीजे मुक्त गणेशोत्सवातून सामाजिक सलोख्याचा आदर्श निर्माण करूया!”प्रशांत सुबनावळ

सहाय्यक पोलीस निरीक्षक

फलटण ग्रामीण पोलीस

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

32
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

error: Content is protected !!